साखर खरोखरच हानिकारक आहे का? तज्ञांकडून जाणून घ्या गोड खाण्याची योग्य पद्धत

कोणत्याही गोष्टीचा अतिवापर नेहमीच हानिकारक असतो. मग ती साखर असो किंवा कोणतीही दुसरी वस्तु.

Updated: Mar 31, 2022, 05:21 PM IST
साखर खरोखरच हानिकारक आहे का? तज्ञांकडून जाणून घ्या गोड खाण्याची योग्य पद्धत title=

मुंबई : बरेच लोक वजन वाढण्यामागे साखरेला कारणीभूत मानतात. याशिवाय साखरेमुळे अनेक आरोग्याशी संबंधीत प्रश्न उपस्थीत केले गेले आहेत. ज्यामुळे लोकांच्या मनात साखरेबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. परंतु साखर आपल्या शरीरासाठी महत्वाची देखील आहे. त्यामुळे आपण साखर केव्हा आणि कोणत्या रुपात घेतो, यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे साखरेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घ्या, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील.

साखर ही खरोखरच आपल्या आरोग्याची शत्रू आहे का?

कोणत्याही गोष्टीचा अतिवापर नेहमीच हानिकारक असतो. मग ती साखर असो किंवा कोणतीही दुसरी वस्तु, साखर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरात पोहोचते. 

साखरेच्या मार्गाबद्दल सांगायचे तर, साखर अन्न आणि फळांच्या माध्यमातून आपल्या शरीरात पोहोचते, कारण आपण ती चावून खातो आणि त्यात ग्लुकोजची पातळी कमी असते. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी चांगले असते आणि शरीर तेवढी साखर मेन्टेन्ट करतं.

परंतु दुसरीकडे, जर आपण  रसाच्या रूपात आपण साखर घेतली, तर ते थेट आपल्या रक्तात मिसळते आणि आपल्याला त्वरित ऊर्जा देते. परंतु हे समजून घ्या की, प्रत्येकाला नेहमीच ज्यूसची गरज नसते. त्यामुळे डाएट प्लॅननुसार ते घ्यावे.

जे लोक सेमी लिक्विड डाएटवर असतात, ते जास्त ज्यूस घेतात. दुसरीकडे, साखर थेट ऊर्जेचा स्त्रोत आहे आणि ती रक्ताबरोबर जमा होते, म्हणून मुलांना कमी गोड खायला द्यावे.

साखर किती घ्यावी?

जेव्हा आपण गोड खातो तेव्हा आपल्या जिभेवर एक थर तयार होतो. याच कारणामुळे ती गोष्ट पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. मानवनिर्मित कार्ब साखरेमध्ये जास्त असते, ज्यामुळे ते आपल्याला हानी पोहोचते.

आपण दररोज 24 ते 30 ग्रॅम साखर म्हणजेच 6 चमचे साखर खावी, परंतु बहुतेक लोक दिवसभरात 75 ते 80 ग्रॅम म्हणजेच 8 ते 9 चमचे साखर खातात. तुम्हाला हवे असल्यास, साखरेऐवजी तुम्ही तुमच्या आहारात नैसर्गिक गोड म्हणजे गूळ किंवा मध समाविष्ट करू शकता.

दिनचर्या आणि आरोग्याच्या स्थितीनुसार गोड खाऊ शकता

तुम्ही दिवसभरात किती गोड खावे हे तुमच्या दिनचर्येवर आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर एखादा ऍथलीट त्याच्या आहारात रस किंवा फळाच्या स्वरूपात मिठाई खाऊ शकतो, कारण तो त्या कॅलरीज बर्न करतो.

दुसरीकडे, जर एखाद्याला मधुमेह किंवा कोणताही आजार असेल, तर त्याच्या आहारात साखरेचे प्रमाण कमी-जास्त असते. जर तुम्ही फळे खात असाल तर सर्व प्रकारची फळे खाणे आवश्यक आहे. कारण सर्व फळांमध्ये वेगवेगळे आवश्यक घटक आढळतात.

ब्राऊन शुगर हे आरोग्यासाठी कमी हानिकारक आहे असा भ्रम काही लोकांमध्ये असतो, पण तपकिरी साखरही थेट शरीरात विरघळते म्हणून तसे होत नाही. याशिवाय गोड म्हणून आपण देशी खांड, बोराही खाऊ शकतो. हे साखरेसारखे हानिकारक नाही, परंतु ते देखील योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे, म्हणजे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही.