चहा पिल्याने खरंच त्वचा काळी पडते? काय आहे तथ्य जाणून घ्या..

Tea Interesting Facts: अनेकदा असं बोललं जाते की चहामुळे आपली त्वचा ही खराब होते. परंतु त्यात किती तथ्यं आहे यावर काहीच ठोस पुरावा आतापर्यंत हा सापडलेला नाही. त्यामुळे या लेखातून आपण जाणून घेऊया की नक्की यामागील तथ्यं काय आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Sep 5, 2023, 05:14 PM IST
चहा पिल्याने खरंच त्वचा काळी पडते? काय आहे तथ्य जाणून घ्या.. title=
does drinking tea makes your skin dark know the myths vs facts

Tea Interesting Facts in Marathi: चहा प्यायल्यानं आपली त्वचा काळी होते का? असा आपल्याला कायमच प्रश्न पडला असतो. यातील खरं काय आणि खोटं काय हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. तुम्ही असं म्हणताना ऐकलं असेल की जास्त चहा पिऊ नकोस काळी पडशील. परंतु नक्की हे असं खरंच होतं का? नक्की याबाबतच काय कारण असावं? यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? आपल्या सर्वांनाच चहा आवडतो. आपण रोज चहाचे सेवन हे करतोच करतो. चहाशिवाय आपला दिवसही पुर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे चहा आपण स्किप केला तर आपल्यालाही फार चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. चहाचे आपल्या शरीराला फायदेही पुष्कळ आहेत आणि सोबतच चहाचे तोटेही अधिक आहेत. आपण जास्त चहा प्यायला की आपल्याला एसिडिटी होऊ शकते. पण पी हळदं हो गोरी... आणि मग तसंच चहा पिऊन त्वचा काळी होते हा नक्की काय प्रकार आहे, हे जाणून घेऊया. 

खरंतर चहा पिऊन आपली त्वचा काळी होते असं म्हटलं जातं. परंतु यात किती तथ्य आहे. हे तपासून पाहता येईल. सोबतच चहा पिऊन काळं व्हायला होतं, या विधानाला पुष्टी देणारेही काही ठोस पुरावे नाहीत त्यामुळे खरंच असं काही होतंच असं आपण ठामपणे म्हणून शकत नाही. आत्तापर्यंत हे कुठे सिद्धही झालेले नाही. त्यामुळे चहामुळे आपली त्वचा काळी होते हे बोलणं काही योग्य ठरणार नाही. लहान मुलांना घाबरवण्यासाठी असं बोललं जात असावं, त्यामुळे याची जास्त चर्चा रंगत गेली. 

काय आहेत फॅक्ट्स? 

आपल्या त्वचेचा रंग हा पुर्णपणे मेलेनिन जेनेटिक्स आणि आपल्या जीवनशेैलीवर जास्त अवलंबून आहे. आपण जास्त उन्हात फिरतो तेव्हा हो, आपली स्कीन ही टॅन होते पण अर्थात ती काळी होत नाही. स्कीन टॅन झाल्यावर ती परत आपण पुर्वीसारखी करू शकतो. त्यासाठी त्वेचेवर लावण्यासाठी क्रीम आणि लोकशन्स असतात. परंतु चहाच्या रंगाचा आणि त्यामुळे आपला रंग काळा होण्याचा काहीच संबंध नाही. चहाचा रंग आणि त्वचेच्या रंगाचा काहीच संबंध नाही. 

आपण दुधासोबत चहा नाही प्यायला तर ग्रीन टी, ब्लॅक टीचेही आपल्या शरीराला फार फायदे आहेत. ग्रीन टी आपलं संपुर्ण शरीर हे डिटॉक्स करते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)