पाच वर्षाच्या रिव्यानीचे मृत्यूनंतर केले 6 अवयवांचे दान !

सहा वर्षीय रिव्यानी रहांगडाले या चिमुरडीने जगातून निरोप घेतानाही मृत्यूच्या दारात असलेल्या तिघांना जिवदान देत दोन जणांच्या जीवनातील अंधकार दूर केला. देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल केजी २ची ती विद्यार्थी होती.  

Updated: Apr 29, 2018, 10:24 AM IST
 पाच वर्षाच्या रिव्यानीचे मृत्यूनंतर केले 6 अवयवांचे दान !  title=

 मुंबई : सहा वर्षीय रिव्यानी रहांगडाले या चिमुरडीने जगातून निरोप घेतानाही मृत्यूच्या दारात असलेल्या तिघांना जिवदान देत दोन जणांच्या जीवनातील अंधकार दूर केला. देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल केजी २ची ती विद्यार्थी होती.  

 नेमके काय घडले? 

निकालाचा आनंद लुटण्यापू्र्वीच रिव्यानीने जगाचा निरोप घेतला आहे. कुटुंबासोबत उन्हाळी सुट्ट्या आनंदाने घालवत असताना 19 एप्रिलला  मामासोबत दुचाकीने जाताना एक मद्यधुंद गाडीचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. रिव्यानीच्या डोक्याला जबर दुखापत झाला. रिव्यानीला तातडीने नागपुरात न्यू ईरा हॉस्पिटलला हलविण्यात आले.

 रिव्यानीने ७ दिवस मृत्यूशी झुंज दिली. शुक्रवारी रिव्यानीला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. रिव्यानीच्या आईवडिलांवर तर दु:खाचा पहाड कोसळला. मात्र आपली मुलगी गेली तरी 
अवयवाच्या प्रतिक्षेत असलेल्यांनी जीवदान मिळेल या सामाजिक हेतून तिच्या आईवडिलांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

पाच अवयव केले दान 

शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये रिव्यानीने सर्वांना अवयव दानाचा संदेश दिला होता.जाताजाता मुलीच्या अवयवदानामुळे कुणाला तरी जग बघता येणार या दूरदृष्टीने आईवडीलांनी तिचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. तिचे ५ अवयव - हृदय , डोळे , लिव्हर ,किडनी इत्यादी अवयव दान करण्यात आले. तिच्या आई वडिलांच्या धाडसी  निर्णयामुळे तिन जणांना जीवदान मिळाले तर दोघांनी दष्टी मिळाली व त्यांच्या जीवनातील अंधार दूर झाला .