मुंबई : मुलींना समजून घेणं अशक्य असल्याचं अनेकांचं मत असतं. आपल्या साथीदाराने आपल्याला समजून घ्यायला पाहिजे असा प्रत्येकीचा अट्टाहास असतो. मुलांनादेखील आपल्या गर्लफ्रेंडला प्रेमासोबतच तिच्या सार्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. मात्र मुलींच्या मनातील गोष्टी ओळखणं हे मुलांसाठी महाकठीण काम असते. त्यामुळे त्यांच्या सार्या इच्छा पूर्ण करताना नाकीनऊ येतात. मग पाहूयात गर्लफ्रेंडच्या कोणत्या इच्छा पूर्ण करताना मुलांच्या नाकीनऊ येतात ?
मुलींना जेवण बनवणं सवयीचं असतं. तुमची गर्लफ्रेंड सुगरण असेल तर तिला खाण्याचा पदार्थ बनवून देऊन इम्प्रेस करणं कठीण असते. प्रत्येक मुलाला जेवण बनवण्याची हौस असेलच किंवा उत्तम पदार्थ बनवता येईलच याची खात्री देता येऊ शकत नाही.
मुलींना अनेकदा असं वाटतं की त्यांच्या साथीदाराने न सांगताच मनातलं ओळखलं पाहिजे. प्रत्यक्षामध्ये मुलींच्या मूड स्विंग्ससमोर हे आव्हान पेलवणं मुलांसाठी प्रचंड आव्हानात्मक आहे.
मुलींना नात्यामधील प्रत्येक लहान लहान क्षण एन्जॉय करण्याची इच्छा असते. त्यामुळे रिलेशिनमधील प्रत्येक छोटा मोठा तपशील त्यांच्या लक्षात असतो. सोबतच हे तपशील त्यांच्या साथीदारानेही तशाच प्रकारे एन्जॉय करण्यासाठी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षाही असते.
अनेक मुलींसाठी शॉपिंग किंवा भटकणं हे मूड बुस्टिंग असते. मग न सांगता शॉपिंगसाठी वेळ काढणं, कंटाळा न करणं ही मुलींची अपेक्षा असते. सोबतच अनेकदा मुली केवळ विंडो शॉपिंग करतात. अशावेळी त्यांना सआथ मिळावी अशी गर्लफ्रेंडची इच्छा असते.
मुलींना गिफ्ट आणि त्यातही सरप्राईज गिफ्ट्स फार आवडतात. मात्र मुलांसाठी त्यांना प्रत्येकवेळेस परफेक्ट गिफ्ट मिळावे यासाठी अचूक निवड करणं हे आव्हान असते.