गरोदरपणात दातांचीही काळजी घ्या, अन्यथा गर्भपाताचा धोका !

गरोदरपणाच्या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 

Updated: Jun 18, 2018, 01:50 PM IST
गरोदरपणात दातांचीही काळजी घ्या, अन्यथा गर्भपाताचा धोका !  title=

मुंबई : गरोदरपणाच्या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अनेकदा खाण्या-पिण्याच्या बाबतीमध्ये, फार शारिरीक त्रास होऊ नये याकरिता काळजी घेतली जाते मात्र गरोदरपणाच्या काळात दातांची काळजी घेणंदेखील तितकंच गरजेचे आहे. अन्यथा गर्भपात होण्याची भीती असते.  

अमेरिकेतील धक्कादायक प्रकार 

अमेरिकेमध्ये एका महिलेने मृत बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी या बाळाची अधिक तपसणी केल्यानंतर त्याच्या रक्तामध्ये बॅक्टेरिया आढळले. हे कीटाणू बाळाच्या आईच्या तोंडामध्येही होते. ही घटना 2010 सालची आहे. गरोदरपणाच्या काळात खाण्या-पिण्याबाबत, औषधांबाबत अनेकजण जागृत असतात मात्र तोंडाचे आरोग्य जपणेदेखील तितकेच गरजेचे आहे हे अनेकींना ठाऊकच  नसते. प्रामुख्याने पहिल्या तीन महिन्यात स्त्रियांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.  

तोंडाचे आरोग्य का जपावे ? 

गरोदरपणाच्या काळात शरीरात हार्मोनल बदल होतात. परिणामी दात आणि हिरड्यांशी निगडीत काही समस्या बळावतात. ज्यांना गरोदरपणापूर्वी अशाप्रकारचा कोणता त्रास असेल तर तो अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. वैद्यकीय भाषेत त्याला 'प्रेग्रेंसी जिन्जवाइटिस' म्हणतात. 

धोकादायक लक्षणं

हिरड्यांमध्ये सूज, हिरड्यांमधून रक्त वाहणं, श्वासाला दुर्गंधी येणं, पायरिया, लाळ तयार न होणं. तोंडातील धोकादायक बॅक्टेरिया लाळेतून शरीरात जातात. परिणामी गर्भावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !

गर्भावर कसा होतो परिणाम  

तोंडातील कीटाणूंमुळे एमनियोटिक फ्लूइड नष्ट होते. त्याचा गर्भावर दुष्परिणाम होतो. यामुळे प्रिमॅच्युयर डिलिव्हरीचा धोका संभवतो. अनेकदा मृत बाळाचा जन्म होतो. काहींमध्ये जन्मानंतर अवघ्या काही तासात बाळाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. 

डेंटिस्ट चेकअप गरजेचे 

गरोदरपणाच्या काळातील धोका टाळण्यासाठी स्त्रियांनी अवश्य डेंटिस्ट चेकअप करणं आवश्यक आहे. तोंडाच्या आरोग्याशी निगडीत काही समस्या असल्यास उपचार करण्यास टाळाटाळ करू नका. फ्लोराईडयुक्त टुथपेस्टचा वापर करा. तसेच दिवसातून 2 वेळेस अवश्य ब्रश करा.