सुंदर चेहऱ्यासाठी गाजर आणि नारळ अत्यंत उपयोगी

घरगुती पदार्थांचा सौंदर्यवाढीसाठी वापर केला तर चेहरा चांगला राहतो 

Updated: Aug 6, 2019, 07:03 PM IST
सुंदर चेहऱ्यासाठी गाजर आणि नारळ अत्यंत उपयोगी title=

मुंबई : आताच्या युगात प्रत्येक स्त्रीया आपल्या चेहऱ्याची आणि आरोग्याची विशेष काळजी घेताना दिसतात. त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रराकच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. रसायनयुक्त क्रिममुळे अनेकवेळा चेहऱ्यावर डाग पडतात. तर काहीवेळी साईड इफेक्ट देखील होतो. परंतु, घरगुती पदार्थांचा सौंदर्यवाढीसाठी वापर केला तर चेहरा चांगला राहतो आणि अ‍ॅलर्जी तसेच साईड इफेक्टपासून सुटका होते. सुंदर चेहऱ्यासाठी गाजर आणि नारळ अत्यंत उपयोगी पदार्थ आहे.

गाजर   
त्वचा जर निस्तेज झाली असेल आणि त्यावर तुम्हाला तेज आणायचे असेल तर गाजर एकमात्र उपाय आहे. यासाठी अगोदर गाजर किसून घ्या. त्यामध्ये दही, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घाला. हे मिश्रण १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. या स्क्रबचा आठवड्यातून दोनदा वापर केल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन चेहरावर अधिक उजळ येईल.

नारळ
नारळ हे आपल्या चेहऱ्यावरील सुंदरता वाढवण्यास उपयोगी ठरते,  अगोदर नारळ किसून घ्या. त्यात एक चमचा हळद आणि चंदन तेलाचे १५ थेंब घाला. हे मिश्रण एकत्र करा. त्याची पेस्ट करुन त्याने चेहऱ्यावर स्क्रब करा आणि नंतर चेहरा घुवून घ्या. या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेवर तेजी येईल.