दररोज व्यायाम करणाऱ्यांनी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

व्यायाम करण्यासाठी अधिक उर्जेची गरज भासते.

Updated: Aug 5, 2019, 11:16 PM IST
दररोज व्यायाम करणाऱ्यांनी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा title=

मुंबई : दररोज व्यायाम करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. व्यायाम केवळ फिट ठेवत नाही तर अनेक आजारांपासूनही संरक्षण करतो. पण व्यायाम करण्यासाठी अधिक उर्जेची गरज भासते. त्यामुळे आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे. 

प्रोटीन

शरीराच्या वजनानुसार, दररोज ०.९ ग्राम प्रोटीन आपल्या आहारात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही वजन नियंत्रणात राखू इच्छिता तर कॅलरीचं प्रमाण तपासणं महत्त्वाचं आहे.

फळे

जितकं शक्य आहे तितकं आहारात फळांचा समावेश करा. फळांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असतं. व्यायाम करण्याच्या जवळपास २ तासांपूर्वी आणि त्यानंतरही केळं खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. संत्री, द्राक्षही फायदेशीर ठरतात.

कार्बोहायड्रेट 

कार्बोहायड्रेट प्रोटीनच्या तुलनेत शरीराला लवकर उर्जा प्रदान करतात. याची व्यायामावेळी अधिक आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट मांसपेशींमध्ये ग्लायकोजनची गरज भरुन काढण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आहारात फरसबी, ब्राउन राइस यासारख्या पदार्थांचं सेवन करणं महत्त्वाचं ठरतं. व्यायाम करण्याआधी ५० ग्राम कार्बोहायड्रेट घेण्याचा सल्ला दिला जातो.

बदाम दूध किंवा ओट्स दूध

व्यायाम करण्याआधी बदाम दूध किंवा ओट्स दूध पिणं आवश्यक ठरतं. हे शरीराला पुरेशी उर्जा पुरवण्याचं काम करतात. यामुळे व्यायाम करतानाही उर्जा मिळते. तसंच शरीराला पुरेसं पोषणही मिळण्यास मदत होते.