Belly Fat: आता शरीराला कष्ट न देता होईल पोटाचा घेर कमी, पाहा कसा!

How To Lose Belly Fat: शरीराला कष्ट न देता पोट कमी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बेली फॅट वाढण्याची समस्या आजकाल अनेकांमध्ये दिसून येते. यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि साध्या गोष्टी सांगणार आहोत.

Updated: May 15, 2023, 07:23 PM IST
Belly Fat: आता शरीराला कष्ट न देता होईल पोटाचा घेर कमी, पाहा कसा! title=

How To Lose Belly Fat: आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे ( Wrong Lifestyle ) वजनात वाढ होताना दिसते. वाढलेलं वजन ( Weight Gain ) कमी करणं म्हणजे फार कठीण टास्क मानलं जातं. वजन कमी  ( Weight loss ) व्हावं यासाठी आपण विविध पद्धतींचा अवलंब करतो. यावेळी जीम किंवा योगाचा विचार आपल्या डोक्यात येतो. मात्र आज आम्ही तुम्हाला शरीराला कष्ट न देता कसं पोट ( Belly Fat ) कमी करता येईल याची माहिती देणार आहोत. 

पोटाचा घेर कसा कमी करावा? ( How To Reduce Belly Fat? )

साखरयुक्त पेयं करा कमी

आजकाल तरूण व्यक्तींमध्येही बेली फॅट  ( Belly Fat )  वाढण्याची समस्या दिसून येते. पोटावरची चरबी  ( Belly Fat )  कमी करायची असेल तर तुम्हाला साखरयुक्त पेयांचा वापर कमी करावा लागणार आहे. द जर्नल ऑफ क्लीनिकल इंवेस्टिगेशनच्या म्हणण्याप्रमाणे, अतिरिक्त प्रमाणात याचं सेवन केल्याने पोटावर चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे पोटाचा घेर  ( Belly Fat )  कमी करायचा असेल तर तुम्हाला हे ड्रिंक्स कमी पिणं फायदेशीर ठरेल.

कार्ब्सचं प्रमाण कमी करा

तुम्ही आहारामध्ये ( Diet ) कोणत्या पदार्थांचा समावेश करताय, याकडे लक्ष द्या. कार्ब्स कमी करण्यावर अधिक भर दिला गेला पाहिजे. दररोज तुम्ही तुमच्या डाएटमध्ये 50 ग्राम कार्ब्स घेतले पाहिजेत. यामुळे पोटावरील चरबी  ( Belly Fat )  कमी करण्यास मदत होते.

प्रोटीनचा अधिक समावेश

वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला प्रोटीन ( Protein ) युक्त पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. प्रोटीन पचण्यासाठी शरीराला अधिक काळ लागतो. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते. कमी खाल्ल्यामुळे तुमचं वजन देखील वाढत नाही. 

आवडीच्या व्यायाम करा

व्यायाम म्हटलं की, अनेकजण नाकं मुरडतात. अनेकांना व्यायाम करण्याचा कंटाळाल येतो. मात्र असे व्यायाम करा, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी ( Weight loss ) करण्यास मदत होणार आहे. यामध्ये मित्रांसोबत फिरायला जाणं, ऑफिसचे जिने चढणं किंवा स्विमिंग करणं. या गोष्टींमुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही, शिवाय वजन कमी होण्यास मदत देखील होईल.