मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेचा विषय ठरतो. अक्षयनं जेव्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं तेव्हा त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. त्या अभिनेत्रींच्या यादीत शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), रवीना टंडन (Raveena Tandon) आणि रेखा (Rekha) यांची नावं आहेत.
90 च्या दशकात रवीना आणि अक्षयच्या रिलेशनशिपच्या चर्चा तर जोरात सुरु होत्या. (Akshay Kumar and Raveena Tandon Relationship) आजही लोक त्यावर बोलत असतात. त्यावेळी ते दोघेही त्यांच्या करिअरच्या उंचीवर होते. एवढंच काय तर त्यांची जोडी ही ऑन स्क्रीन जोड्यांपैकी एक होती. आजही प्रेक्षकांना त्या दोघांना एकत्र पाहण्याची इच्छा आहे. 'मोहरा' (Mohra) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
अक्षय आणि रवीना हे एकमेकांच्या खूप जवळ होते कारण ते दोघे ही पंजाबी... त्यामुळे एकमेकांमध्ये अनेक गोष्टी साम्य होत्या. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की ते बऱ्याचवेळा अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते. हे दोघे त्यांच्या रिलेशनशिपविषयी सीरिअस होते आणि त्यांच्या रिलेशनशिपला पुढच्या टप्प्यावर त्यांना न्यायचे होते. (When Akshay Kumar Confessed It Was Only An Engagement Which Broke Up Later With Raveena Tandon Gave The Reason )
अक्षय आणि रवीना दोघांनीही एका मंदिरात गुपचूप लग्न केलं असे देखील म्हटले जातं होते. एका चॅट शोमध्ये रवीना म्हणाली होती की, त्याचं कुटुंब दिल्लीहून आलं आणि त्याच्या कुटुंबातील मोठ्यांनी तिच्या डोक्यावर लाल दुपट्टा ठेवला. ‘कॉस्मोपॉलिटन’नं दिलेल्या वृत्तानुसार, 'हा एक विचार करून घेतलेला निर्णय होता. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीशी माझा साखरपुडा झाला. मला अगदी सामान्य जीवन जगायचं होतं. मी लग्ना आधीच काम सोडण्याचा निर्णय घेतला होता. कारण आम्हाला वाटलं होतं की माझा शेवटचा शूटचा दिवस असेल तेव्हा आम्ही लग्न करू. जेव्हा मी माझ्या करिअरला पुन्हा सुरुवात केली तेव्हा तो पुन्हा म्हणाला की ते सोड आणि आपण लग्न करूया. पण, नंतर मी त्याला सांगितलं की एकदा मी माझ्या करिअरला न निवडता तुला निवडलं होतं, पण आता मी तुला नाही तर करिअरला निवडेन.'
रवीना पुढे म्हणाली, 'हा साखरपुडा मोठ्या जल्लोषात झाला होता. यावेळी पंडित होते पूजा करण्यात आली होती. त्याचे कुटुंब दिल्लीहून आलं होतं आणि माझं कुटुंब सुद्धा दिल्लीहून आलं होतं. त्याच्या घरातल्या एका मोठ्या व्यक्तीनं माझ्या डोक्यावर लाल दुपट्टा ठेवला होता आणि लोकांना आमचं लग्न झालं असं वाटलं.'
दरम्यान, 1998 मध्ये रवीना आणि अक्षय विभक्त झाले. अक्षयनं कधीच त्याच्या आणि रवीनाच्या साखरपुड्यावर वक्तव्य केलं नाही. पण ‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'आमचा फक्त साखरपुडा झाला होता जो नंतर तुटला, पण आमचं लग्न झालं नव्हतं.'