हॉटेलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा नुसता धिंगाणा, Viral Video पाहून डोकं धराल

कधीकधी हे कुतूहलच आपल्याला धक्कादायक गोष्टींच्या समोर आणून ठेवतं.

Updated: May 2, 2022, 04:54 PM IST
हॉटेलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा नुसता धिंगाणा, Viral Video पाहून डोकं धराल  title=

मुंबई : कला जगतामध्ये वावरणाऱ्या आणि विशेष म्हणजे सातत्यानं प्रकाशझोतात असणाऱ्या व्यक्तींच्या नावाभेवती प्रसिद्धीचं वलय असलं, की गोष्टी कुतूहलपूर्ण वाटू लागातात. पण, कधीकधी हे कुतूहलच आपल्याला धक्कादायक गोष्टींच्या समोर आणून ठेवतं. सध्या असंच एका व्हायरल व्हिडीओमुळं पाहायला मिळत आहे. जिथे काही बॉलिवूड अभिनेत्री चक्क एका हॉटेलमध्ये काचेच्या प्लेट्स तोडताना दिसत आहेत. दिग्दर्शिका फराह खान हिनंच हा व्हिडीओ शेअर केला. (Bollywood Actress)

फराहनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हुमा कुरेशी, अदिती राव हैदरी आणि पत्रलेखा या अभिनेत्री स्पष्टपणे दिसत आहेत. तिथंच त्यांच्या टेबलपाशी एक व्यक्ती डान्स करतानाही दिसत आहे. तेव्हाच हुमा, त्या डान्स करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेनं ताट भिरकावते आणि ते जमिनीवर पडून तुटतं.

अदिती राव हैदरीही असंच काहीसं करते. इथं या दोघींचा कल्ला सुरु असतानाच अभिनेत्री पत्रलेखा मात्र त्या दोघींनाही थक्क होऊन पाहताना दिसत आहे.

आता तुम्ही म्हणाल काय हा धिंगाणा….. पण, तसं नाहीये. कारण, एक असं रेस्तराँ आहे, जिथं प्लेट तोडण्याची प्रथाच आहे. त्यामुळं बी- टाऊनच्या या सौंदर्यवतींनीही त्याचा आनंद घेतला. फराहसुद्धा यावेळी या अभिनेत्रींसोबत तिथंच होती.

रोजचं चित्रीकरण , विविध कार्यक्रम आणि सततचं व्यग्र वेळापत्रक या साऱ्यातून वेळ काढत  या अभिनेत्री आणि फराहनं काही आनंदाचे क्षण अनुभवले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीलाही आणले.