विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाकडून रोमँन्टिक अंदाजात शुभेच्छा

कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी टाऊनचे सर्वात लाडकं आणि आवडतं कपल आहेत.

Updated: May 16, 2022, 10:18 PM IST
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाकडून रोमँन्टिक अंदाजात शुभेच्छा title=

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी टाऊनचे सर्वात लाडकं आणि आवडतं कपल आहेत. लग्न झाल्यापासून दोन्ही स्टार्स एकमेकांवर प्रचंड प्रेम अनेकदा व्यक्त करताना दिसतात. अशा परिस्थितीत, जर कतरिनाचा नवरा विकी कौशलच्या वाढदिवसाचा असेल, तर कतरिनाला काहीतरी खास करावंच लागेल. कतरिनाने त्याच्या च्या 34 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या विकीसाठी वाढदिवसाची एक गोड पोस्ट शेअर केली आहे.  

कतरिनाने विकीला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
विकीच्या खास दिवशी, कतरिना कैफने विकीसोबत न्यूयॉर्कच्या सुट्टीतील फोटो शेअर करून त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. एका फोटोत कतरिना विक्कीकडे प्रेमळ नजरेने पाहत आहे. तर दुसऱ्या फोटोत विकी त्याच्या लेडी लव्हला मोठ्या उत्साहाने किस करताना दिसत आहे.

न्यूयॉर्कमधील सुंदर लोकेशनमधला रोमँटिक फोटो शेअर करत कतरिनाने तिच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाने रोमँटिक फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, न्यूयॉर्क वाला बर्थडे. माय हार्ट. तु प्रत्येक गोष्ट खास बनवतोस...  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कतरिनाच्या पोस्टवर विकीची खास कमेंट 
एवढ्या लाडक्या बायकोकडून विकीला अशी मनापासून शुभेच्छा मिळाल्या असतील तर तो शांत कसा राहील. विकीने कतरिनाच्या वाढदिवसाच्या खास पोस्टवर एक खास कमेंट करून आणखीनच खास बनवलं आहे. विकीने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं, शादीशुदावाला बर्थडे. यासह अभिनेत्याने अनेक हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत.