#ValentinesDay2019 : असा असेल सलमान-कतरिनाचा व्हेलेन्टाईन डे

कित्येक वर्ष हे दोघे नात्यात होते पण काही कारणास्तव दोघांचेही मार्ग वेगळे झाले. या दोघांनीही उघडपणे आपल्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. 

Updated: Feb 13, 2019, 06:50 PM IST
#ValentinesDay2019 : असा असेल सलमान-कतरिनाचा व्हेलेन्टाईन डे  title=

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या 'भारत' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा सिनेमागृहात दाखल होणार आहे. एकेकाळी सलमान आणि कतरिनाच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले होते. कित्येक वर्ष हे दोघे नात्यात होते पण काही कारणास्तव दोघांचेही मार्ग वेगळे झाले. या दोघांनीही उघडपणे आपल्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. आता सलमान आणि कतरिना आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत, असं सांगतात.

व्हेलेन्टाईन डेला दोघे 'भारत' सिनेमाचा सिक्वेन्स शूट करणार आहेत. १४ फेब्रुवारीला दोघे पूर्ण दिवस एकत्र राहणार आहेत. सलमान-कतरिनासोबत सुनील ग्रोवर, तब्बू आणि जॅकी श्रॉफ शूटिंग करणार आहेत. नुकताच सलमान-कतरिनाने वेडिंग सॉन्ग शूट केले होते. 

याआधी दोघे 'टायगर जिंदा है' या सिनेमात एकत्र झळकले होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली होती. 'भारत' सिनेमाला दुबई, पंजाब आणि दिल्लीमध्ये शूट करण्यात आले आहे. सिनेमाच्या शेवटच्या शेड्यूल शूटिंगचे काम मुंबईत सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत दिल्लीचा सेट तयार करण्यात आला आहे. या सेटची किंमत तब्बल १० कोटी रुपये आहे. सिनेमाच्या कथेनुसार संपूर्ण सेट नष्ट करण्यात येणार आहे. सिनेमा ५ जून रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. 'भारत' सिनेमा साऊथ कोरियन सिनेमा 'ओड टू माय फादर' सिनेमाचा रिमेक असणार आहे.