रशिया-युक्रेन युद्धातून बॉलिवूड अभिनेत्री थोडक्यात बचावली, पाहा नक्की काय घडलं?

24 फेब्रुवारी हा दिवस युक्रेनसाठी अत्यंत धोकादायक आणि भीतीदायक ठरत आहे.

Updated: Feb 24, 2022, 07:32 PM IST
 रशिया-युक्रेन युद्धातून बॉलिवूड अभिनेत्री थोडक्यात बचावली, पाहा नक्की काय घडलं? title=

मुंबई : 24 फेब्रुवारी हा दिवस युक्रेनसाठी अत्यंत धोकादायक आणि भीतीदायक ठरत आहे. बॉम्बस्फोटांमुऴे युक्रेनमधील रहिवाशांचे डोळे उघडले आहेत.

सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्रीचा जीव थोडक्यात बचावला आहे. तिने योग्य वेळी योग्य ती पावले उचलली नसती तर तीही या युद्धात सापडली असती.

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे नशीब म्हणावे लागेल की यावेळी थोडक्यात बचावली. खरंतर, उर्वशी रौतेलाचा 25 फेब्रुवारीला वाढदिवस होता, त्यामुळे ती तिच्या कुटुंबासह आधीच प्लान ठरलेल्या वाढदिवसाच्या सुट्ट्यांसाठी मालदीवला पोहोचली.

मात्र याच्या 2 दिवस आधीपर्यंत उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटाचे शूटिंग युक्रेनमध्येच करत होती. जिथून तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला होता.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर युक्रेनमध्ये अनेक क्षेपणास्त्र हल्ले सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत जर उर्वशी रौतेला तिथे असती तर ती अडकली असती.

रूस-यूक्रेन युद्ध से बाल-बाल बची ये बॉलीवुड एक्ट्रेस, कई दिनों से चल रही थी फिल्म की शूटिंग

उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमध्ये तिच्या आगामी 'द लीजेंड' चित्रपटाचे शूटिंग करत होती. उर्वशी या चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.