'राणा दा' चे बर्थडे सेलिब्रेशन !

 'चालतंय की...' असं म्हणत सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता हार्दिक जोशीचा आज वाढदिवस.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 6, 2017, 10:06 PM IST
'राणा दा' चे बर्थडे सेलिब्रेशन ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : 'चालतंय की...' असं म्हणत सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता हार्दिक जोशीचा आज वाढदिवस. कोल्हापूरच्या मातीतील पहेलवान साकारणारा आपल्या लाडक्या 'राणा दा' ला सोशल मीडियावरून अनेकांनी शुभेच्छा दिल्या.  

झी मराठीच्या फेसबुक पेजवरुनही त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हार्दिकने त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो केक कापताना दिसत आहे. टेलिव्हिजन विश्वात हार्दिक फार आधीपासून सक्रिय होता. त्याने अनेक मालिकांमध्ये लहानसहान भूमिका साकारल्या होत्या.मात्र ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने त्याला ओळख निर्माण करून दिली. 

‘राणा दा’च्या स्वभावातील साध्याभोळ्या आणि रांगड्या गुणांमुळे ही भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली. या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या हार्दिकने ‘रंगा पतंगा’ या चित्रपटात ‘एसीपी पाठक’ची भूमिका साकारली होती. त्याशिवाय ‘स्वप्नांच्या पलिकडले’ या मालिकेतूनही तो झळकला होता. अभिनयाव्यतिरिक्त हार्दिक मुंबईच्या ‘मोरया’ ढोल ताशा पथकामध्ये वादनही करायचा.