सिनेमातील या 6 चुकांमुळे पुष्पाला बसला असता मोठा फटका, तुमच्या लक्षात आल्या का या चुका?

 चित्रपट बनवताना निर्मात्यांनी अशा काही चूका केल्या आहेत, ज्यामुळे कदाचित सिनेमा फ्लॉप ठरु शकला असला. 

Updated: Jan 29, 2022, 03:03 PM IST
सिनेमातील या 6  चुकांमुळे पुष्पाला बसला असता मोठा फटका, तुमच्या लक्षात आल्या का या चुका? title=

मुंबई : 'पुष्पा द राइज' आजकाल भरपूर कमाई करत आहे आणि साऊथ सिनेमाचे सर्व रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, तरीही चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. नुसता चित्रपटच काय तर यामधील सगळी गाणी हिट ठरली आहेत. अल्लू अर्जुनपासून ते चित्रपटातील प्रत्येक कलाकारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या चित्रपटाच्या संवादांपासून ते कलाकारांच्या स्चटाईलमुळे लोकांना वेड लागले आहे. सोशल मीडियावर सगळेच लोकं या चित्रपटातील गाण्यापासून ते डायलॉगवर व्हिडीओ करत आहेत.

पण या सगळ्यात, चित्रपट बनवताना निर्मात्यांनी अशा काही चूका केल्या आहेत, ज्यामुळे कदाचित सिनेमा फ्लॉप ठरु शकला असला. परंतु लोकांच्या नजरेतून या चूका निसटल्या आहेत. आता आम्ही चित्रपटातील ज्या चुका दाखवणार आहोत, त्या पाहून बघा तुमच्या या चुका लक्षात आल्यात का?

1. पहिली चूक फक्त पुष्पाच्या जिवलग मित्रासोबतच झाली. ज्या केशवला आदल्या दिवशी व्हॅनचा गेट उघडता येत नव्हता तो व्यक्ती दुसऱ्याच दिवशी फार जोरात आणि चांगल्या प्रकारे कार चालवत होता. एका दिवसात इतकी चांगली गाडी चालवता येणे या संकल्पनेत निर्मात्यांनी मोठी चूक केली.

2. पोलीस अधिकाऱ्याला दिलेली लाचेची रक्कम चित्रपटात अनेक वेळा मोजण्यात आली होती. पण आम्ही तुम्हाला सांगतो की सीनमध्ये दिसलेल्या नोटा खऱ्या होत्या की खोट्या. या दृश्यात सरकारने बंदी घातलेल्या एक हजाराच्या जुन्या नोटा दिसत आहेत. पण नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, या जुन्या नोटेवर तळाशी एक नंबर आहे, तर जुन्या हजाराच्या नोटांवर त्या ठिकाणी नंबर नव्हता.

3. या चित्रपटात एक रात्रीचे दृश्य दाखवण्यात आले आहे. पण रात्रीच्या अंधारात बाहेर पडणाऱ्या लोकांच्या मागे ऊन पडलं आहे. अल्लूच्या स्टँडिंग फिल्ममध्ये दिवसाला रात्र दाखवण्यात आली होती.

4. पुढची चूक चित्रपटाच्या त्या दृश्यात घडली जेव्हा अल्लू अर्जुन खिशात पैसे ठेवतो, तेव्हा ती नोट खिशा बाहेर दिसली, पण नेक्ट सिनमध्ये हे पैसे त्याच्या खिशातच दिसले.

5. जर आपण पुष्पाच्या बालपणीचे दृश्य पाहिले तर बालपणीच्या एका दृश्यात पुष्पाची आई त्याला पकडण्यासाठी धावत आहे आणि या चित्रपटात प्रथम सायकलस्वार दिसतो पण पुढच्या दृश्यात अचानक सायकलस्वार गायब होतो.

6. पुष्पामधील सर्वात मोठी चूक म्हणजे, त्या सीनमध्ये पुष्पा लाल चंदनाचे ओंढके पाण्यात टाकतो. ज्यावर संपूर्ण स्टोरी आधारित आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लाल चंदानाची किंमत करोडो रुपये आहे. या लाल चंदनाची एक खासियत आहे की, हे लाकूड पाण्यात बुडतं. त्याचा दर्जाही तसाच ओळखला जातो. पण सिनेमात मात्र लाकूड पाण्यात तरंगत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. जे चुकिचं आहे. या गोष्टीमुळे कदाचित या सिनेमाची स्टोरी बदलली गेली असती.