'त्यांच्यासमोर आमची लायकी काय?', रणबीरला उद्देशून 'या' अभिनेत्याचं वक्यव्य

कालच रणबीरचा सिनेमा शमशेरा रिलिज झाला आहे. 

Updated: Jul 23, 2022, 12:07 PM IST
'त्यांच्यासमोर आमची लायकी काय?', रणबीरला उद्देशून 'या' अभिनेत्याचं वक्यव्य title=

Shemshera vs RK/RKay Clash :  बॉलीवूडमध्ये सध्या जोरात चर्चा आहे ती रणबीर कपूरची. दोन महिन्यांपुर्वी अभिनेत्री आलिया भट्टसह रणबीरचे लग्न झाले. त्यातून याच महिन्यात त्या दोघांनी आपल्या बाळाची गुडन्यूजही दिली आहे. आता रणबीरचा 'शमशेरा' हा चित्रपटही रिलिज झाला आहे. संजय दत्त, वाणी कपूर आणि रणबीर कपूर यांची या चित्रपटात प्रमुख भुमिका आहेत. 

सध्या रणबीरची सगळीकडे जोरात हवा असून त्याचा चाहतावर्गही 'रणबीरमय' झाला आहे. कालच रणबीरचा सिनेमा 'शमशेरा' रिलिज झाला आहे. आता लवकरच सप्टेंबरमध्ये त्याचा 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट रिलीज होणार आहे. 'शमशेरा'च्या रिलिजसोबतच काल रजत कपूर यांचा RK/RKay हाही चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रजत कपूर यांच्या या चित्रपटासोबत रणबीरचा 'शमशेरा' क्लॅश झाल्यामुळे दिग्दर्शक रजत कपूर यांचे नुकतेच एक वक्तव्य समोर आले आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रजत कपूर यांनी याबद्दलच एक खुलासा केला आहे. त्यांना रणबीरच्या 'शमशेरा'सोबत 'आरकेआरके' हा चित्रपट क्लॅश झाल्यामुळे यावर चित्रपटाचे निर्माते - दिग्दर्शक म्हणून मतं विचारले तेव्हा ते म्हणाले की, ''मला असं वाटतं नाही की आमच्या चित्रपटांमध्ये काही क्लॅश आहे. दोन्ही चित्रपट आपल्यापरीने खूप चांगले आहेत. 'शमशेरा' चित्रपटाच्या मागे यश राज यांचे बॅनर आहे पण आमच्याकडे ते नाही त्यामुळे आमची तेवढी लायकीही नाही की आम्ही अशा बाबतीत यश राज फिल्मच्या समोर. 'शमशेरा'साठी तीन हजारहून जास्त स्क्रिन्स आहेत. पण आमच्यासाठी केवळ ऐंशीच स्क्रिन्स आहेत. माझी इच्छा हीच आहे की जास्तीत जास्त लोकं या चित्रपटासाठी येवोत आणि दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमकू देत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

रजत कपूर यांनी याआधीही 'कडाख', 'आंखों देखी', 'फाटसो' असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्या RK/RKay या चित्रपटातून अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने कमबॅक केले आहे.