तर 'हा' अभिनेता असता 'स्त्री' मधील 'विक्की', त्या नकारामुळं राजकुमार राव बनला चंदेरीचा रक्षक

Stree Movie Rejection: श्रध्दा कपुरचा 'स्त्री 2' हा यावर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रध्दा कपुर 'स्त्री 2' मध्ये प्रमुख भुमिकेत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. 

Updated: Aug 26, 2024, 01:04 PM IST
तर 'हा' अभिनेता असता 'स्त्री' मधील 'विक्की', त्या नकारामुळं राजकुमार राव बनला चंदेरीचा रक्षक title=

Vicky Kaushal Rejected Stree: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' सध्या चांगलाच चर्चेत आहे. रिलीजच्या दोन आठवड्यांनंतरही हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने जगभरात 500 कोटींचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट 2018 मध्ये आलेल्या 'स्त्री' चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे सिक्वेल आहे. 'स्त्री' चित्रपटात राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार होते. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही आपल्याला हेच कलाकार दिसतात.

'स्त्री' या चित्रपटाच्या पहिल्या भागापासूनच चंदेरीचा रक्षक असलेल्या 'विक्की' या राजकुमार रावच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळताना दिसले. आणि या व्यक्तिरेखेसाठी त्याचे खूप कौतुकही झाले. राजकुमार राव आज या भुमिकेमुळे लोकप्रिय झाला असला तरी, तुम्हाला एकून आश्चर्य वाटेल की राजकुमार राव हा या भूमिकेसाठी पहिली पसंती कधीच नव्हता. हे खरं आहे की राजकुमारच्या आधी विकी कौशलला स्त्री या हॉरर-कॉमेडी चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली होती. पण त्याने या चित्रपटाला नकार दिला होता आणि याचा आज विकी कौशलला पश्चात्ताप होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

'मनमर्जियां'साठी विकीने सोडला होता 'स्त्री' 

विकी कौशलला जेव्हा व्होग बीएफएफच्या मंचावर विचारण्यात आले होते की, "असा कोणता चित्रपट आहे जो त्याने नाकारला होता आणि आता तो चित्रपट खूप यशस्वी झाला आहे, त्यामुळे तुम्हाला आता पश्चात्ताप होत आहे?" यावर विकीने, 'स्त्री' असे उत्तर दिले होते. पुढे तो म्हणाला की "मी त्यावेळी 'मनमर्जियां' हा चित्रपट करत होतो आणि त्यामुळे मला 'स्त्री'साठी नाही म्हणावे लागले." 

'मनमर्जियां' मधील विक्की कौशलचे निळे केस आणि अभिनयाचे कौतुक झाले असले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. मात्र त्याचवेळी 'स्त्री' चित्रपट राजकुमार रावच्या करिअरला नवीन वळन देणारा ठरला. पण तुम्हाला विक्की कौशलला 'स्त्री' चित्रपटात 'विक्की' च्या भुमिकेत बघायला आवडले असते का?