आठवड्याभरात The Kerala Story चा विक्रमी गल्ला; कमावले 'इतके' कोटी रूपये

The Kerala Story Box Office Collection Day 7: सातव्या दिवशी या The Kerala Story या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यातून येत्या काही काळात हा चित्रपट 100 करोड क्लबमध्येही पोहचू शकतो. पाहा सलग सातव्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 12, 2023, 12:12 PM IST
आठवड्याभरात The Kerala Story चा विक्रमी गल्ला; कमावले 'इतके' कोटी रूपये title=

The Kerala Story Box Office Collection: 'द करेला स्टोरी' या चित्रपटानं आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांगली कमाई केली आहे. 5 मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन नये म्हणून या चित्रपटावर केरळ सरकारनं आक्षेपही घेतले होते व या चित्रपटाचा वाद हा सुप्रिम कोर्टापर्यंतही पोहचला आहे. सध्या यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. परंतु या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मात्र दमदार कमाई केली आहे. सलग सातव्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आहे. Sachnik नुसार, 7 व्या दिवशी या चित्रपटानं 80 कोटींचा गल्ला भरला आहे. (The Kerala Story Box Office Collection Day 7 the film collects 80 crore rupees hits on box office)

यावर्षी 'पठाण', 'तू झूठी मैं मक्कार', 'किसी का भाई किसी की जान' हे मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यांनी बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कमाई केली होती. 'पठाण' हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. जगभरात या चित्रपटानं हजारो कोटींची कमाई करत जानेवारीच्या महिन्यात म्हणजे या वर्षीच्या सुरूवातीलाच मोठी कमाई केली होती. एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेला 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर आपली फारशी जादू दाखवू शकला नाही. पठाणच्या मोठ्या यशानंतर 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपेशल आपटला. तर 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट मात्र चांगल्यापैंकी गाजला. 

'द काश्मिर फाईल्स'नंतर 'द केरला स्टोरी' सुपरहिट? 

2020 मध्ये लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर मात्र हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फिके पडू लागले. मार्चनंतरचे अधिकतम चित्रपट हे ओटीटीवरच आले. काही चित्रपट चित्रपटगृहात लावण्याचा प्रयत्न केला परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही. शेवटी वर्षभरानंतर म्हणजे 2021 च्या दिवाळीत मात्र हिंदी चित्रपटसृष्टीला कोविडनंतर नवसंजीवनी मिळाली होती. 'सुर्यवंशी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आलेले असले तरी मात्र त्यानंतर बॉक्स ऑफिसवर चित्रपट हे जोरजोरात आपटू लागले होते. मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बॉलिवूडचे बारा वाजले होते त्याऊलट प्रेक्षकांनी प्रादेशिक सिनेमांना पसंती दिली होती. 

हेही वाचा - आर्थिक मंदीमुळे बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलेला परदेश; आज करतेय नेत्याला डेट

परंतु त्यानंतर 2022 च्या मार्चमध्ये आलेल्या 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाका उडवला आणि 'स्टार्स'पेक्षा आता प्रेक्षक चांगला आणि वेगळा विषय पाहण्यासाठी येत असल्याची चर्चाही सुरू झाली होती. आता पुन्हा तेच चित्र दिसून येते आहे. 'पठाण' सोडला तर अनेक मोठी स्टारकास्ट असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडताना दिसत आहेत. त्यात आता 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या अपयशानंतर 'द केरला स्टोरी'नं बॉक्स ऑफिवर हीट कमाई केली आहे. 

कसं आहे 'द केरला स्टोरी'चं बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन? 

'द केरला स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर सुरूवातीला चांगलं कलेक्शन केले होते. त्यातून तीन दिवसातच 50 कोटींचा गल्ला भरला होता. आता अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.