मुंबई : मराठीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांचे फीमेल फॅन फॉलोअर्स प्रचंड प्रमाणात आहेत. मालिका, सिनेमांतून असे अनेक चेहरे समोर आलेत ज्यांच्यासाठी तरुणी अक्षरश: वेड्या होतात.
१. ललित प्रभाकर - जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून ललित प्रभाकर घरांघरात पोहोचला. त्याचा चार्मिंग लूक अनेक तरुणींना घायाळ होतात.
२. शशांक केतकर - झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री अर्थात शशांक केतकरला मोठी प्रसिद्धी मिळाली.
३. अमेय वाघ - गालावर खळी असलेल्या या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. दिल दोस्ती दुनियादारीमधील त्याचा अभिनय प्रेक्षकांनी उचलून धरला.
४. रिषी सक्सेना - मराठी नसला तरी मराठी मालिकाविश्वात आपले नाव कमावणारा अभिनेता म्हणजे रिषी सक्सेना, काहे दिया परदेस या मालिकेतून रिषीने मराठीत पदार्पण केले आणि अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली.
५. यशोमन आपटे - झी युवावर सध्या एका मालिकेने तरुणवर्गाला भुरळ पाडलीये ती म्हणजे फुलपाखरु. यातील मुख्य भूमिकेतील यशोमन आपटे सध्या समस्त तरुण मुलींच्या गळ्यातील ताईत झालाय.
६. सुयश टिळक - का रे दुरावा मालिकेतून या मालिकेतून सुयश टिळक फेमस झाला. सध्या हा अभिनेता बापमाणूस या मालिकेतही मुख्य भूमिका साकारतोय.