मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपवले. एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ' 'काय पो छे', 'पीके' या चित्रपटांतील त्याचा अभिनय सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. मात्र, इथपर्यंत येण्यासाठी सुशांत राजपूतने प्रचंड संघर्ष केला होता. सुशांतने दिल्लीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.
...म्हणून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली का? धक्कादायक खुलासा
एका मुलाखतीत सुशांतने सांगितले होते की, सुरुवातीच्या काळात तो बॉलिवूड चित्रपटांतील गाण्यांमध्ये एक्स्ट्रा डान्सर म्हणून काम करायचा. त्याकाळी तो सहा जणांसोबत एक रुम शेअर करत होता. बॉलिवूडमध्ये काम करायला लागल्यानंतर २५० रुपये ही त्याची पहिली कमाई होती. तरीही सुशांत काम मिळवण्यासाठी संघर्ष करत राहिला.
सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अंकिता लोखंडे म्हणाली...
२००८ साली त्याला बालाजी टेलिफिल्मसच्या 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेतून पहिला ब्रेक मिळाला. मात्र, ही मालिका विशेष चालली नाही. अखेर २००९ साली आलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे सुशांत खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. या मालिकेतील 'मानव' या व्यक्तीरेखेने त्याला घराघरात पोहोचवले. यानंतर २०१३ मध्ये सुशांतला 'काय पो छे' या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. या चित्रपटातील अभिनयाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'काय पो छे' नंतर सुशांतने 'शुद्ध देसी रोमान्स' हा चित्रपट केला. तर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक M.S. Dhoni: The Untold Story हा त्याचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला. यामध्ये त्याने आपल्या संयत अभिनयाने धोनीची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत केली.