सनी देओल मुलांसोबत दारू पितो? अभिनेत्यानं प्रामाणिकपणे सांगितलं खरं काय ते...

Sunny Deol on Alchol: सनी देओल दारू पितो का? सनी देओल आपल्या मुलांसोबत दारू पितो का? तो दारू पितो हे त्याच्या मुलांना माहिती आहे का? त्याच्या वडिलांना माहिती होते का? सध्या या सर्व प्रश्नांची उत्तर सनी देओलनं दिली आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 14, 2023, 05:34 PM IST
सनी देओल मुलांसोबत दारू पितो? अभिनेत्यानं प्रामाणिकपणे सांगितलं खरं काय ते...  title=
sunny deol explains does he cosume alchol or not latest google trending news

Sunny Deol on Alchol:  हे वर्ष सनी देओलसाठी सर्वात लकी ठरलं. यावर्षी त्याचा 'गदर 2' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली होती. त्यानंतर हा चित्रपट हीट झाल्यानंतरही या चित्रपटाच्या संपुर्ण टीमनं सेलिब्रेशन पार्टीही केली होती. बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या पार्ट्या होताना दिसतात. त्यामुळे तेव्हा दारू आणि नशापाणी असते असा शिक्का बॉलिवूड कलाकारांवरती असतो. परंतु सनी देओल मात्र याला अपवाद आहे असंही म्हणता येईल. सध्या त्यानंच याबाबत एक खुलासा केला आहे. सनी देओल दारू पितो की नाही? यावर त्यानं आपलं मतं माडंलं आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की यावर सनी देओल काय म्हणाला आहे? यावेळी त्याला एका मुलाखतीत तुम्ही दारू पिता का? असा थेट प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

यावेळी त्यानं 'माशाबेल इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. यावेळी तो आपल्या मुलाच्या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. यावेळी तो 'दोनो'चं प्रमोशन करत होता. त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपण दारू पित नसल्याचे संदर्भासह स्पष्टीकरण दिले आहेत. ''असं नाही की मी दारू पिण्याचा प्रयत्न केला नाही. मी इंग्लंडला गेल्यावर तिथल्या सोसायटीचा एक भाग होण्याचा प्रयत्न केला पण दारूचं मला काही कळलंच नाही. म्हणजे दारू इतकी कडू आहे व त्याचा वास इतका घाणेरडा आहे अन् दारू प्यायल्याने डोकं दुखतं मग लोक दारू का पितात? खरं तर ती पिण्याचा काहीच फायदा नाही त्यामुळे मी पुन्हा प्रयत्न केला नाही,” असं यावेळी सनीनं स्पष्ट केले. 

हेही वाचा : अभिषेक बच्चन, करिश्मा कपूरचं लग्न तुटण्यास जया बच्चन कारणीभूत?

यापुढे त्याचा मुलगा राजवीर देओल म्हणाला की, ''जेव्हा मी पहिल्यांदा फक्त एकच बिअर घेतली होती तेव्हा बाबाला कळलं होतं. बाबा झोपले होते आणि मी माझा चार्जर त्यांच्या पलंगाच्या शेजारी ठेवला होता तो घ्यायला मी गेलो होतो. पण मी चुकून त्यांचा चार्जर घेतला आणि त्यांना वाटलं की मी नशेत आहे. त्यांना माझ्याजवळ बिअरचा वास येत होता''. 

मुलांसोबत दारू पितो का? 

''माझ्या दोन्ही मुलांनी कधी दारू प्यायला सुरुवात केली ते मला कळलंच नाही. माझ्या घरात नेहमीच असंच होतं. माझ्या वडिलांना माझ्याबद्दलच्या अनेक गोष्टी माहित नव्हत्या. मी एका शिस्तप्रिय कुटुंबातून आलो आहे पण मला जे काही करायचे होते ते मी केले. मात्र मला दारू कधीच आवडली नाही.'' असं सनी देओल म्हणाला.