What Sunny Deol said about Shahrukh Khan Salman Khan Akshar Kumar: बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विद करण 8' सुरु झाला आहे. त्याचा दुसरा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या एपिसोडमध्ये आपल्याला देओल ब्रदर्स म्हणजेच सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघे एकत्र पाहायला मिळणार आहेत. यावेळी त्या दोघी कलाकारांनी बॉलिवूडमधील अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार या तिघ कलाकारांच्या कोणत्या गोष्टी आवडतं नाही याविषयी वक्तव्य केलं आहे. याशिवाय सनी देओलनं आमिर खानवर देखील कमेंट केली आहे. रॅपिड फायर दरम्यान, केलेले हे खुलासे एकदा पाहाच...
करण जोहरच्या रॅपिड फायर राऊंडमध्ये सनी देओलला त्याच्या सहकलाकाराविषयी एक चांगली आणि एक वाईट गोष्ट विचारण्यात आली होती. सगळ्यात आधी करणनं सनीला शाहरुख खानविषयी विचारलं. (शाहरुख आणि सनी देओलमध्ये काही काळापूर्वी वाद झाला होता असं म्हटलं जातं होतं. मात्र, 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीत शाहरुख खाननं हजेरी लावली होती. त्या दोघांमध्ये सुरु असलेला वाद आता संपला आहे.) सनीनं करणच्या या प्रश्नावर उत्तर देत सांगितलं की 'मला शाहरुख खानची एक गोष्ट खूप आवडते. तो खूप मेहनत करतो. पण त्यानं कलाकारांना सामान (कमोडिटी) बनवलं आहे.'
अक्षय कुमार विषयी विचारताच सनी देओल म्हणाला, 'मला त्याच्यात असलेली शिस्त आवडते, पण दरवर्षी इतके जास्त चित्रपट करणे आवडत नाही.' यावर्षी अक्षय कुमारनं 'सेल्फी', 'ओएमजी 2' आणि 'मिशन रानीगंज' हे चित्रपट प्रदर्शित झाले. दरम्यान, त्याच्याकडे अजून 'वेलकम टू द जंगल', 'हेरा फेरी 3', 'सोरारई पोटरू रीमेक', 'बडे मियां छोटे मियां' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.
सलमान खानविषयी विचारण्यात आलं तर सनी म्हणाला, 'तो मोठ्या मनाचा आहे. मला त्याची ही गोष्ट खूप आवडते. तर त्याचं नेहमी कोणाला नाही कोणाला बॉडीबिल्डिंग शिकवणं मला आवडत नाही.' दरम्यान, जेव्हा सलमान 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीत आला होता तेव्हा त्यांना खूप आनंद झाला होता. तो त्यावेळी सलमानला काय म्हणाला याविषयी सांगत सनी म्हणाला, 'तू नेहमी मला तुझ्या घरी पार्टीला बोलावल, पण मी कधी आलो नाही. आज मी एकदा बोलावलं आणि तू आलास. मला खूप आनंद झाला.' त्याशिवाय बॉबीनं देखील सलमानविषयी वक्तव्य केलं. बॉबीनं सांगितलं की सलमान खानला तो 'मामू' या नावानं हाक मारतो. बॉबीनं पुढे सांगितलं की 'जेव्हा त्याच्याजवळ चित्रपट नव्हते, तेव्हा सलमान त्याच्या पाठीशी उभा राहिला होता.'
हेही वाचा : झोपडपट्टीतील महिलेनं अबरामला जबराम हाक मारताच, शाहरुखची अनपेक्षित Reaction
आमिर खानविषयी देखील या शोमध्ये सनी देओलनं वक्तव्य केलं. तो म्हणाला, "पार्टी दरम्यान, आमिर खान आला आणि मला म्हणाला मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी म्हणालो, माझ्याशी काय बोलायचं आहे भाई? दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो आणि आम्ही बराचवेळ बोलत होतो. 'लौहर 1947' ची पटकथा आम्ही त्यावेळी डिस्कस केली आणि आता आम्ही एकत्र काम करतोय."