'विसर्जनाची जागा बदलली पण भावना नाही', असं म्हणत सुबोध भावेने शेअर केला व्हिडिओ

घरच्या घरी विसर्जन करण्याचं केलं आवाहन 

Updated: Aug 24, 2020, 05:46 PM IST
'विसर्जनाची जागा बदलली पण भावना नाही', असं म्हणत सुबोध भावेने शेअर केला व्हिडिओ  title=

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात गणरायाचं आगमन झालं आहे. कोरोनाची कितीही सावट असलं तरी गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह काही कमी झालेला नाही. उत्सव अतिशय साधेपणाने पण त्याच उत्साहात साजरा होताना दिसत आहे. 

कोरोनाचं संकट असताना गणरायाचं आगमन अतिशय शांततेत आगमन झालं. दीड दिवसांच्या बाप्पाने आदरातिथ्यानंतर भक्तांचा निरोप देखील घेतलं आहे. यंदा प्रशासनाने बाप्पाचं विसर्जन हे घराच्या घरी करण्याचं आवाहन नागरिकांना केलं होतं. आपल्या घरी किंवा राहत्या इमारतीच्या गच्चीवर बाप्पाचं विसर्जन करा आणि गर्दी टाळा, असं आवाहन केलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

"गणपती बाप्पा मोरया" दिखाव्यापलीकडची बाप्पावरची श्रद्धा आणि त्याच्या वरचं प्रेम कायम असुदे, न मागताही तू इतकं काही देतोस, आता तू दिलेल्या आयुष्याला उत्तम पद्धतीने आणि आनंदाने जगायची बुद्धि आम्हाला दे, सूर निरागस दे! 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

या आवाहनाचं पालन करत अभिनेता सुबोध भावेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘गणपती विसर्जन.. त्याच उत्साहात, तो जाताना तीच हुरहूर, विसर्जनाची जागा बदलली म्हणून भावना नाही बदलली’, असं म्हणत त्याने चाहत्यांनाही विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्याचं आणि शक्यतो घरीच विसर्जन करण्याचं आवाहन केलं.

कोरोनाच्या या संकटकाळात गर्दी आवर्जून टाळायची आहे. अशावेळी उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून प्रशासनाने घरच्या घरी बाप्पाचं विसर्जन करण्यास सांगितलं. हे आवाहन सुबोध भावेने पाळून पुणेकरांना देखील अशाच साधेपणाने विसर्जन करण्यास सांगितलं आहे.