मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर दिशा सालियानची आत्महत्या चर्चेत आली. सुशांतच्या आत्महत्येच्या सहा दिवसांपूर्वी सुशांतची एक्स मॅनेजर दिशाने ८ जून रोजी मालाड येथील एका इमारतीवरून १४ व्या मजल्यावरून आत्महत्या केली होती.
दिशाच्या आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार दिशाचा फोन तिच्या मृत्यूनंतरही ऍक्टिव होता. एवढंच नाही तर तिचा फोन फॉरेन्सिक टीमला तपासणीकरता पाठवण्यात आवा नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार १७ जूनपर्यंत दिशाचा फोन सुरू होता.
दिशाचा मृत्यूमागचं कारण अद्याप कळलेलं नाही. तसेच दिशाच्या पोस्टमार्टमवेळी व्हिडिओग्राफी देखील केलं नव्हतं. या आत्महत्येची तपासणी देखील केली नव्हती. दिशाचा ऑटोप्सी रिपोर्ट देखील दोन दिवसानंतर करण्यात आला होता. ज्यानंतर तिच्या आत्महत्येबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत.
सोशल मीडियावर युझर्सचं म्हणणं आहे की, दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा एकमेकांशी संबंध आहे. सोशल मीडियावर या दोन्ही आत्महत्या चर्चेचा विषय होता. दिशा आणि सुशांत एकमेकांशी चर्चा करत होते. रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान दोघेही एप्रिल महिन्यात एकमेकांच्या संपर्कात होते. दोघं कामानिमित्त अनेकदा बोलले होते. दिशा कलाकारांची पीआर मॅनेजर म्हणून कार्यरत होती.