Emraan Hashmi च्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी, अभिनेत्यावर झाला हल्ला

अभिनेता इम्रान हाशमीवर अज्ञातांचा हल्ला  

Updated: Sep 19, 2022, 10:19 PM IST
 Emraan Hashmi च्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी, अभिनेत्यावर झाला हल्ला title=

मुंबई : बॉलिवूडचा (bollywood) सिरियल किसर अभिनेता इम्रान हाशमीच्या (Emraan Hashmi)  चाहत्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान हाशमीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शुटींग वरून परतताना या अभिनेत्यावर हा हल्ला करण्यात आला होता. या घटनेने एकचं खळबळ उडाली आहे. 

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी (Emraan Hashmi) जम्मू-काश्मीरममध्ये (Jammu and Kashmir) शूटिंग करत होता. ही शुटिंग पुर्ण झाल्यानंतर टीम सोबत परतत असताना त्याच्यावर दगडफेक (Stone pelting) करण्यात आली होती. पहलगामच्या मुख्य बाजारपेठेत त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. अज्ञात लोकांनी हा हल्ला केल्याची माहीती आहे. या हल्ल्यात सुदैवाने इमरान हाशमी बचावला आहे. 
 
दरम्यान या घटनेनंतर पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कलम 147, 148, 370, 336,323 लावण्यात आले आहेत.

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी (Emraan Hashmi) त्याच्या ग्राउंड झिरो (ground zero) या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा चित्रपट सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्राउंड झिरो या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर करत आहेत. यामध्ये इमरान हाशमीसोबत सई ताम्हणकर आणि झोया हुसैन दिसणार आहेत. 

इमरान हाशमीला (Emraan Hashmi) बॉलिवूडमध्ये सीरियल किसर म्हणून ओळखले जाते. राज, मर्डर, जहर, आशिक बनाया आपने, कलयुग आणि गँगस्टरमध्ये तो दिसला आहे. तो शेवटचा डिबुक या चित्रपटात दिसला होता. हा हॉरर चित्रपट विशेष प्रेक्षकांना आवडला नाही. तसेच तो चेहरे या चित्रपटातही दिसला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चनही होते. हा चित्रपटही फारसा चालला नाही. दरम्यान त्याच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.