'अभिषेकचा तो शर्ट आजही...', 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये नाना पाटेकरांचा जुन्या आठवणींना उजाळा'

Nana Patekar-Amitabh Bachchan :  नाना पाटेकर यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 11, 2024, 07:18 PM IST
'अभिषेकचा तो शर्ट आजही...', 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये नाना पाटेकरांचा जुन्या आठवणींना उजाळा'  title=
(Photo Credit : Social Media)

Nana Patekar-Amitabh Bachchan : छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती 16' हा लोकप्रिय शो आहे. या शोकडे सगळेच माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. अनेकदा या शोमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी हे हजेरी लावताना दिसतात. इतकंच नाही तर यावेळी ते त्यांचे अनेक किस्से देखील अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत आणि प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसतात. आगामी एपिसोडमध्ये ‘वनवास’ या चित्रपटातील अभिनेता नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उ यांनी हजेरी लावणार आहेत. 

हा एपिसोड शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. नाना पाटेकर हे यावेळी हॉट सीटवर बसले होते. त्यांनी यावेळी त्यांच्या काही आठवणी आणि किस्से सांगितले आहेत. नाम फाऊंडेशनसाठी नाना पाटेकर यावेळी हा खेळ खेळत होते. नाना पाटेकर त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलताना दिसेल. शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकर यांचा उद्देश आहे.

एका हृदयस्पर्शी क्षणी, नाना पाटेकर यांनी ‘नाना’ शब्दाशी निगडीत एक किस्सा सांगितला. ते म्हणाला, “आम्ही ‘कोहराम’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. एक दिवस अमितजी आले आणि सगळ्यांना मिठाई देऊ लागले. मी त्यांना विचारले की काय बातमी आहे? त्यावर ते म्हणाले, “माझ्या मुलीला बाळ झाले, मी नाना झालो!” त्यावर आपल्या विनोदबुद्धीबद्दल ओळखल्या जाणाऱ्या नाना यांनी टिप्पणी केली, “किती तरी वर्षं झाली, मी तर जन्मापासूनच नाना आहे.”

यानंतर नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतची एक गोड आणि व्यक्तीगत आठवण शेअर केली. ते म्हणाले, “एक दिवस अमितजी एक मस्त शर्ट घालून आले होते. मी त्यांना शर्ट चांगला आहे असे सांगितले तेव्हा ते म्हणाले की तो अभिषेकचा शर्ट आहे. संध्याकाळी अमितजी निघून गेल्यानंतर मला निघायला जरा उशीर झाला होता. माझ्या शूटनंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये गेलो, तेव्हा तो शर्ट तिकडे हँगरवर लावून ठेवला होता. आजही तो शर्ट माझ्याकडे आहे.”

हेही वाचा : घेणं न देणं टॉपला येणं... अभिषेक-ऐश्वर्यामुळे अमिताभ, जया नाही तर 'ही' सेलिब्रेटी World Top 10 मध्ये
 
नाना आणि अमिताभ बच्चन यांच्या सहवासात अनेक स्मरणीय राहतील अशा अनेक आठवणी आणि अनुभव त्यांनी सांगितले. या शुक्रवारी, 'कौन बनेगा करोडपती 16' च्या या विशेष भागात ते दिसणार आहेत. त्यावेळी आणखी अनेक गोष्टी या पाहायला मिळणार आहे.