चाहत्यासाठी इतकं कोण करतं? Fan च्या निधनाची बातमी मिळताच सूर्याने जे केलं ते पाहून डोळे पाणावतील

South Star Surya : दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानं त्याच्या चाहत्यासाठी जे केलं ते कोणीच करु शकत नाही... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 29, 2023, 04:56 PM IST
चाहत्यासाठी इतकं कोण करतं? Fan च्या निधनाची बातमी मिळताच सूर्याने जे केलं ते पाहून डोळे पाणावतील title=
(Photo Credit : Social Media)

South Star Surya : प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते असतात. प्रत्येक चाहता जेव्हा त्याचा आवडत्या कलाकाराचा चित्रपट येतो तेव्हा त्यासाठी खूप उत्सुक असतो. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकाराविषयी सगळं माहित असतं पण सगळ्या कलाकारांना त्याच्या सगळ्या चाहत्यांविषयी माहित नसतं. त्यात दाक्षिणेतील कलाकारांसाठी तर त्यांचे चाहते जीव देण्यास करतात. त्यांच्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी ती सतत तडजोड करताना दिसतात. पण कधी तुम्ही पाहिलंत का आपल्या चाहत्याचे निधन झाले म्हणून कोणता कलाकार हा त्यांच्या घरी पोहोचतो? असं खरंच घडलं आहे... 

दाक्षिणात्य अभिनेता सूर्यानंचे लाखो चाहते आहेत. तो त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच उभा असतो. दरम्यान, नुकतंच सूर्याच्या एका चाहत्याचे निधन झाले. त्यानंतर सूर्या त्याच्या चाहत्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेला होता. त्याविषयी सूर्याच्या एका फॅनपेजनं एक्स अकाऊंट म्हणजेच पूर्वीचे ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. सूर्याचा चाहता अरविंदचं रस्ता अपघातात निधन झाले. त्यानंतर सूर्या अरविंदच्या घरच्यांचे सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला. त्यावेळी समोर आलेल्या फोटोत एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे सूर्या त्याच्या चाहत्यांवर देखील तितकेच प्रेम करतो. सूर्या त्याच्या चाहत्याच्या फोटो समोर हात जोडून उभा असून त्याच्या चाहत्याला श्रद्धांजली वाहिली. त्या फोटोत सूर्या अरविंदच्या कुटुंबासोबत बोलून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सूर्याचे फोटो समोर आल्यानंतर त्यावर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अनेक नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे. 

हेही वाचा : 'अनेक मुलींना मी लग्नाच्या शालूत दफन होताना पाहिलंय'; खान सरांचं वाक्य ऐकून अमिताभही गहिवरले

सूर्या त्याच्या चाहत्यांसाठी असं उभं राहण्याची ही पहिली वेळ नाही. तो नेहमीच जेव्हा त्याच्या चाहत्यांना गरज असते किंवा त्यांच्यासोबत अशी दुःखद घटना घडली तर सूर्या भावूक होतो. याआधी देखील सूर्या त्याच्या चाहत्यांच्या कुटुंबाला अशा परिस्थितीत भेटला आहे. इतकंच नाही तर तो त्यांना सांत्वन देखील देताना दिसतो. सूर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'कंगुवा' या चित्रपटात दिसणार आहे.