मुंबई : कलाकारांचं आयुष्य आणि त्यांच्या जगण्याची शैली पाहता, 'किती रे देवा एखाद्याची श्रीमंती', असेच उदगार नकळत आपल्या तोंडातून निघतात. अस असलं तरीही सेलिब्रिटींच्या आयुष्याबाबत वाटणारं कुतूहल मात्र कमी होत नाही. अशाच एका अभिनेत्याची आलिशान Lifestyle नुकतीच सर्वांच्या भेटीला आली आहे.
luxurious आयुष्य जगणारा हा अभिनेता एखाद्या राजाहून कमी नही, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. हा अभिनेता आहे, राम चरण. (Ram Charan)
लोकप्रिय तेलुगू अभिनेता चिरंजीवी यांचा हा मुलगा. हैदराबादमध्ये एका भव्य बंगल्यामध्ये राम चरण आणि त्याचं कुटुंब राहतं. या बंगल्याचीच किंमत जवळपास 38 कोटी इतकी आहे. हैदराबादमधील ज्युबली हिल्स या भागात हा बंगला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार राम चरणचं वार्षिक उत्पन्न 1300 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याच्याकडे Rolls Royce Phantom ही रॉयल कार आहे. शिवाय भेट स्वरुपात मिळालेली एक ब्रिटीश स्पोर्ट्स बाईकही त्याच्याकडे आहे.
Range Rover बीएमडब्ल्यू 7 सीरीज, मर्सिडीज बेंज एस क्लास आणि ऑटोग्राफी अशा कार त्याच्याकडे आहेत. बरं इतकी श्रीमंती पाहून थकला असाल तर थांबा कारण थक्क करण्याजोग्या आणखीही बऱ्याच गोष्टी आहेत.
राम चरणकडे स्वत:ची अशी, एक एअरलाईनही आहे. ट्रू जेट असं या एअरलाईनचं नाव. शिवाय त्याची एक निर्मिती संस्थाही आहे. राम चरण हैदराबादमधील एका पोलो क्लबचा मालकही आहे. भारतातील सर्वात महागड्या कलाकारांमध्ये त्याचं नाव गणलं जातं. आहे की नाही, एखाद्या बॉलिवूड कलाकाराला लाजवणारं ऐश्वर्य?