सोनाली कुलकर्णीच्या 'या' डान्सचं होतेय कौतुक, VIDEO एकदा पाहाचं

मराठी चित्रपटसृष्टीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

Updated: Jul 7, 2022, 07:29 PM IST
सोनाली कुलकर्णीच्या 'या' डान्सचं होतेय कौतुक, VIDEO एकदा पाहाचं  title=

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतली अप्सरा सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडिय़ावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिने असाच एक डान्सचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या तिच्या डान्सचे नेटकरी खुप कौतूक करतायत.  

सोनाली कुलकर्णीचे नाव घेताच 'अप्सरा आली...'वर तिने केलेल्या बेभान नृत्य आणि अदाकारीची दृश्यं डोळ्यांसमोर तरळू लागत. आता अजून एका नव्या गाण्यावर तिने दिलेला भन्नाट परफॉर्मन्स असंख्य चाहत्यांना वेड लावतो आहे. या भन्नाट परफॉर्मन्सचा व्हिडिओ तिने कु अॅपवर पोस्ट केला आहे. हा तिचा डान्स परफॉर्मन्स चाहत्यांना आवडलाय. 

 'तमाशा लाइव्ह' या तिच्या बहुचर्चित चित्रपटातले एक नवेकोरे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'मला तुझा रंग लागला' असे या गाण्याचे बोल आहेत. सोनाली अतिशय आकर्षक पेहरावात या गाण्यात डान्स करताना दिसतेय. अल्पावधीतच या गाण्याला तब्ब्ल 1 मिलियनहून जास्त व्ह्युज मिळाले आहेत. 'तमाशा लाइव्ह'ची खास गोष्ट म्हणजे यात स्वत: सोनालीनेही 'कडकलक्ष्मी' हे गाणे गायले आहे.

'तमाशा लाइव्ह' हा सिनेमा 15 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सोनालीसह पुष्कर जोग, सिद्धार्थ जाधव, मृणाल देशपांडे, सचित पाटील, नागेश भोसले, भरत जाधव, हेमांगी कवी, मनमीत पेम यांच्या भूमिका आहेत.