कॉर्पोरेट चित्रपटाला 16 वर्ष पूर्ण, दिग्दर्शकाची खास पोस्ट

2006 साली प्रदर्शित झालेल्या कॉर्पोरेट चित्रपटाला आता 16 वर्ष पूर्ण झाले आहेत. 

Updated: Jul 7, 2022, 06:58 PM IST
कॉर्पोरेट चित्रपटाला 16 वर्ष पूर्ण, दिग्दर्शकाची खास पोस्ट title=

मुंबई : 2006 साली प्रदर्शित झालेल्या कॉर्पोरेट चित्रपटाला आता 16 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त चित्रपटाचे दिग्दर्शक मधूर भांडारकर यांनी खास पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटा संबंधित अनेक आठवणींना एका आगळ्याच शैलीत उजाळा दिलाय.

बिपासा बसु, केके मेनन, मिनिषा लांबा आणि राज बब्बर अशा दिग्गज तारे-तारकांनी सजलेल्या या चित्रपटाचे नाव 'कॉर्पोरेट' आहे. या चित्रपटाला इंडस्ट्रीत गुरुवारी 16 वर्ष पूर्ण झालीत. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही खुप कौतूक केले होते.दोन दिग्गज उद्योगपतींमधील संघर्ष अत्यंत सुरेखपणे पडद्यावर चित्रित करणारा दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी चित्रपटाला 16 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  

पोस्टमध्ये काय़?

मधुर भांडारकर यांनी कू अॅपवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मधुर भांडारकर यांनी कॉर्पोरेट सिनेमाच्या शुटींग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत बिपाशा बासूला ते तिची भूमिका समजावताना दिसत आहेत. कॉर्पोरेट हा माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे, जो कॉर्पोरेट जगातल्या रिंगसाइड व्ह्यूवर प्रकाश टाकतो. बिपाशा बसु, केके मेनन, रजत कपूर आणि राज बब्बर यांनी या सिनेमात ताकदीचा अभिनय केलाय. तसेच सहारा पिक आणि प्रिसेप्ट पिक शैलेंद्र सिंह यांच्याद्वारे निर्मिती केली गेली असल्याची माहिती त्यांनी दिलीय. तसेच या पोस्टमध्ये #16yearsoffilmCorporate असा हॅशटॅग वापरण्यात आला होता. 

या चित्रपटाची कथा मुख्यत: दोन प्रभावशाली उद्योगपतींमधल्या सत्तेच्या खेळाभोवती फिरताना दिसते. विनय सहगल यांची सहगल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज (एसजीआई) आणि धर्मेश मारवाह यांची मारवाह ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज (एमजीआई) यांच्यामधल्या सत्तेच्या खेळाभोवतीच्या कॉर्पोरेटच्या कथेत सगळ्याच व्यक्तीरेखा अतिशय कौशल्याने चितारलेल्या आहेत. दोन्ही कंपन्या खाद्य आणि पेय उत्पादनांच्या व्यवसायातल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असतात. त्यांच्यातले राजकारण, व्यावसायिक डावपेच अगदी प्रभावीपणे चित्रित केले गेले आहेत. या सिनेमातल्या दमदार अभिनयासाठी बिपाशा बसुला को बेस्ट एक्ट्रेसचा सन्मानही मिळाला होता.