गायक केकेच्या निधनानंतर प्रसिद्ध रॅपरला लोक का विचारतायेत, 'तु कधी मरशील... '

'कोणी तुम्हाला भेटण्यासाठी मरत आहेत, तर कोणी तुमच्या मरणाची वाट पाहात आहेत'  

Updated: Jun 2, 2022, 12:38 PM IST
गायक केकेच्या निधनानंतर प्रसिद्ध रॅपरला लोक का विचारतायेत, 'तु कधी मरशील... ' title=

मुंबई : प्रसिद्ध गायक केकेने बुधवारी अखेरचा श्वास घेतला. कोलकत्यात रंगलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान हार्ट अटॅकमुळे निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी केकेने शेवटचा श्वास घेतला. केकेच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. सिद्धू मुसेवाला आणि केके या दोन दिग्गज गायकांच्या मृत्यूनंतर गायक आणि रॅपर बादशाह सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 

बादशाहने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. इंस्टाग्रामवरील त्याच्या पहिल्या स्टोरीमध्ये, बादशाहने ट्रोलरच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, "तू कब मरेगा (तू कधी मरणार)" असं ट्रोलर बादशाहाला म्हटला आहे. 

स्क्रिन शॉर्ट शेअर करत बादशाह म्हणतो, 'आम्हाला दररोज अनेक प्रकारच्या द्वेषाचा सामना करावा लागतो...', यावेळी बादशाहने ट्रोलरची ओळख उघड केली नाही. 

बादशाहा पुढे म्हणतो, 'तुम्ही जे काही पाहात आहात, तो फक्त एक भास आहे. कोणी तुम्हाला भेटण्यासाठी मरत आहेत, तर कोणी तुमच्या मरणाची वाट पाहात आहेत', सध्या बादशाहची स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.