अंगभर रंग लावून अभिनेत्री इतकी बोल्ड झाली, की हा चित्रपट तुम्ही मोठ्यांसोबत पाहूच शकत नाही

बऱ्याच चर्चेनंतर तिनं या चित्रपटासाठी होकार दिला होता. 

Updated: Jun 2, 2022, 12:12 PM IST
अंगभर रंग लावून अभिनेत्री इतकी बोल्ड झाली, की हा चित्रपट तुम्ही मोठ्यांसोबत पाहूच शकत नाही  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सीरिज किंवा चित्रपटाचा विषय काहीही असो, कथानकाच्याच अनुषंगानं त्यामध्ये दृश्यांचा भरणा पाहायला मिळतो. काही चित्रपट हे त्याच्या कथानकामुळे गाजतात, तर काही मात्र त्यातील दृश्य आणि डायल़ॉगमुळे. (Bollywood movie rangrasiya nandana sen)

काही वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामध्ये झळकलेल्या अभिनेत्रीची झलक पाहून सर्वजण गारद झाले. रातोरात ही अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आली. ती प्रसिद्ध होण्यास कारणीभूत ठरली ती म्हणजे चित्रपटात असणारी आणि तिनं साकारलेली काही बोल्ड दृश्य. 

ही अभिनेत्री म्हणजे नंदना सेन (Nandana Sen). 2014 मध्ये नंदना 'रंग रसिया' या चित्रपटात झळकली होती. अभिनेता रणदीप हुड्डा याच्यासोबत तिनं चित्रपटातून स्क्रीन शेअर केली होती. 

रणदीप आणि नंदनाचे काही बोल्ड सीन या चित्रपटात दाखवण्यात आले होते. या दोघांचीही ऑनस्क्रीन केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती. ज्यावेळी तिला या चित्रपटाची कथा ऐकवण्यात आली होती, त्यावेळी तिचे आईवडीलही तिथेच होते. बऱ्याच चर्चेनंतर तिनं या चित्रपटासाठी होकार दिला होता. 

nandana Sen

हार्वर्ड विद्यापीठातून साहित्याची पदवी घेतलेल्या नंदनानं चित्रपटांव्यतिरिक्त ऑपरेशन स्माइल नावाच्या ग्लोबल चिल्ड्रन एनजीओसाठी स्माइल एम्बेसेडर म्हणूनही पदभार पाहत होती. चित्रपटांमधील काही वर्षांच्या कारकिर्दीनंतर तिनं जॉन मॅकिन्सन याच्याशी लग्न केलं.