अभिनेत्रीचे अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत प्रेमसंबंध, एक्स बॉयफ्रेंडचं लग्न झाल्यानंतर ती....

 बॉलिवूडच्या रंगीत विश्वात रिलेशनशिपच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. अभिनेते आणि अभिनेत्री यांचे ब्रेकअप त्यांनंतर...  

Updated: Mar 4, 2022, 02:12 PM IST
अभिनेत्रीचे अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत प्रेमसंबंध, एक्स बॉयफ्रेंडचं लग्न झाल्यानंतर ती.... title=

मुंबई : झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नातं कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. बॉलिवूडच्या रंगीत विश्वात रिलेशनशिपच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. अभिनेते आणि अभिनेत्री यांचे ब्रेकअप त्यांनंतर जीवनात दुसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होते. अनेक तरुणांची क्रश असलेली असलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर फक्त तिच्या सिनेमांमुळे नाही तर, अनेकदा रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत आली. 

अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत श्रद्धाचं नाव जोडण्यात आलं. त्यामधील तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडचं लग्न देखील झालं. आता  देखील श्रद्धा आयुष्यात एक खास व्यकी आहे. पण याबद्दल कधी श्रद्धाने खुलासा केला नाही.

अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor)
'आशिकी 2' फेम अभिनेता अभिनेता आदित्य रॉय कपूरला देखीव श्रद्धा डेट करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर दोघांनी 'ओके जाणू' सिनेमात एकत्र काम केलं. त्यांनी कधी नात्याची कबुली दिली नाही. अखेर 5 वर्षांनंतर दोघे विभक्त झाले.

अभिनेता फरहान अख्तर
फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूरने ‘रॉक ऑन 2’ सिनेमात एकत्र काम केलं आहे. सिनेमात दोघे मुख्य भूमिकेत झळकले. 'बागी' सिनेमाच्या यशानंतर दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. दरम्यान दोघांच्या नात्याबद्दल देखील चर्चा तुफान रंगल्या. 

आणि फरहान अख्तर रिलेशनशिपमध्ये असल्याचं, त्यामुळे शक्ती कपूर खूश नसल्याचंही बोललं जात होतं. आता फरहानने अभिनेत्री शिबानी दांडेकरसोबत लग्न केलं आहे. 

रोहन श्रेष्ठा (Rohan Shrestha)

रोहन श्रेष्ठा (Rohan Shrestha)

श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. परंतु 2018 पासून दोघे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे.  याबाबत श्रद्धा, रोहन किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.