'आधी लग्न होवू तर दे' आलिया-रणबीरच्या लग्नावर शिल्पा शेट्टी असं का म्हणाली?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा आहे.

Updated: Apr 11, 2022, 01:57 PM IST
'आधी लग्न होवू तर दे' आलिया-रणबीरच्या लग्नावर शिल्पा शेट्टी असं का म्हणाली? title=

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. नुकतीच नीतू कपूरची एक मुलाखत व्हायरल झाली होती. ज्यामध्ये या दोघांनी लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर, आता शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये ती आलिया आणि रणबीरच्या लग्नावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. सध्या शिल्पाने जे सांगितलं आहे ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

नुकताच शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा पापाराझी तिला रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल विचारतात तेव्हा शिल्पा जोरजोरात हसू लागते. यानंतर शिल्पा म्हणते. 'लग्न त्यांचं आहे यावर मी काय बोलणार'. तर दुसरीकडे, पापाराझींनी तिला वारंवार विचारलं असता, शिल्पा म्हणते, 'आधी होऊ तर दे'. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी शिल्पा शेट्टीने सिबीलिं दिनानिमित्त तिची बहीण शमिता शेट्टीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी आपल्या बहिणीसोबत खूप क्यूट एक्सप्रेशन देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही खूप गोड दिसत आहेत.