लॉकअपमध्ये सायशा- मंदानाचं लिपलॉक; व्हिडिओ व्हायरल

कंगना रणौत अनेकदा लॉकअपमधील स्पर्धकांचे क्लास घेताना दिसते.

Updated: Apr 11, 2022, 01:49 PM IST
लॉकअपमध्ये सायशा- मंदानाचं लिपलॉक; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : कंगना रणौत अनेकदा लॉकअपमधील स्पर्धकांचे क्लास घेताना दिसते. अलीकडेच 'क्वीनने जेलचा माहोल बदलून टाकला. कंगनाने सगळ्या स्पर्धकांना सांगितलं की, त्यांच्या आवडीच्या सदस्यांना त्यांना किस करायचं आहे. मात्र हे किस  तुम्हाला ओठांच्या आकाराचा छाप दिलेला आहे. त्यांनेच करायचं आहे. मात्र सायशा आणि मंदाना यांनी जे केलं ते पाहून  सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये सायशा म्हणताना दिसत आहे की, मंदाना तिला आकर्षित करते आणि नंतर ती तिला किस करते. व्हिडिओमध्ये कंगना राणौत 'प्रेम नेहमीच आपली छाप सोडतं असंच आपल्याला यावेळीही करायचं आहे.' असं म्हणताना दिसत आहे. यानंतर अंजली सायेशाचं कौतुक करते आणि ती खूप गोड असल्याचं सांगते आणि तिला किस करते. पूनम पांडे पायल रोहतगीला निवडते आणि म्हणते की, 'मी काही गोष्टी केल्या आहेत ज्या कधी-कधी करू नयेत असं मला वाटतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शिवम शर्मा आणि झीशान मंदाना करीमीचं नाव घेतात. दुसरीकडे, मुनव्वर फारुखी सायेशाला किस करतो. मात्र मंदानाचं कौतुक करत साईशा तिला किस करते. सायशा म्हणते की, मंदाना तिला आकर्षित करते. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांसोबत लिपलॉप केलं. 

काहीदिवसांपुर्वी साईशा लॉक-अपच्या बाहेर पडली होती. कंगना राणौतशी पंगा घेणं साईशावर भारी पडलं होतं. यानंतर कंगनाने  तिला शोमधून बाहेर काढलं. नुकतीच ती पुन्हा लॉकअपमध्ये परतली आहे. त्याचबरोबर, मंदाना करीमी देखील वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून लॉकअपमध्ये आली आहे.