मुलगा झाल्याची गुडन्यूज कळताच शेफाली शहानं नर्सकडे केली अजब मागणी; म्हणाली...

Shefali Shah : गरोदरपणाची चाहूल लागली की आपल्या मनात नेहमी हा प्रश्न येतो, मुलगा होणार की मुलगी? त्यावेळी आपल्याला आपल्या आप्तांकडूनही अनेक प्रश्न विचारले जातात. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं असाच एक वेगळा किस्सा सांगितला आहे.  

गायत्री हसबनीस | Updated: Oct 18, 2023, 01:31 PM IST
मुलगा झाल्याची गुडन्यूज कळताच शेफाली शहानं नर्सकडे केली अजब मागणी; म्हणाली... title=
shefali shah says she asked nurse to check her baby boy if it would be a girl

Shefali Shah : गरोदरपणाची चाहूल लागली की स्त्रियांना अनेकदा जण हा प्रश्न विचारतातच की तुला कोण पाहिजे मुलगा की मुलगी? एका अभिनेत्रीचीही अशीच एक गोष्ट आहे. या अभिनेत्रीच्या गोष्टीची सुरूवात इथून होत नाही तर एका वेगळ्या गोष्टीनं होते. या अभिनेत्रीचं नावं आहे शेफाली शहा. यावेळी अभिनेत्री शेफाली शहा हिनं 'कौन बनेगा करोडपती' या रिएलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिनं आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माचा एक किस्सा सांगितला आहे. किस्सा हा रंजक असला तरीसुद्धा त्यातून आपण बरंच काही शिकू शकतो. यावेळी ती काय म्हणाली आहे हे आपण पाहूया. शोमध्ये ती गप्पांच्या ओघात म्हणाली की, ''आपल्याला जेव्हा मुलं होतं तेव्हा नक्कीच आनंद होता. त्यात काहीच दुमतं नाही. त्यातून माझ्यासाठीही हा क्षण फार खास होता. खासकरून जर मला मुलगी झाली असती तर मला फारच आनंद झाला असता'', असं त्या म्हणाल्या. 

त्यांच्या या बोलण्यावरून हे नक्की कळते की शेफाली शहा यांना मुली फार जास्त आवडतात आणि त्यांच्याही पोटी मुली जन्माला याव्यात अशी त्यांचीही इच्छा होती. शेफाली शहा यांना दोन मुलं आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, ''आम्हाला पहिला मुलगा झाला तेव्हा आम्हाला फार आनंद झाला होता. परंतु मला मुलगी हवी होती पण ठीक आहे. त्यानंतर आम्हाला परत मुलगा झाला. ज्यावेळी मला हे नर्सनं येऊन सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला आहे तेव्हा मग मी तिला असं म्हणाले, परत चेक करा कदाचित की मुलगी असावी.'' अशी आठवण त्यांनी सांगितली. 

त्यानंतर त्या असंही म्हणाल्या की, ''अनेकांना मुलगी हवी असते परंतु असे अनेक प्रकार आजही घडतात की तान्ह्या मुलींना मंदिराच्या परिसरात अथवा कुठेतरी रस्त्यावर सोडून देण्यात येते. ही फारच दुर्दैवाची बाब आहे.'' 'कौन बनेगा करोडपती'चे 15 वे सिझन सुरू आहे. यावेळी शेफाली शहा या झारखंड येथे 'नारायण समाज सेवा' चालविणाऱ्या राम पांडे यांच्यासोबत आल्या होत्या. राम पांडे हे 35 मुलींना सांभाळतात ज्यांना त्यांच्या परिवारांनी सोडून दिलं आहे.  ]

हेही वाचा : आईच्या फोटोसमोर केक कापताना प्रतीक बब्बर भावूक; पण फोटोत टॅग केलेली 'ती' अभिनेत्री कोण?

शेफाली शहा ही अनेकदा संवेदनशील मुद्द्यावरही बोलताना दिसते. त्यामुळेही तिची विशेष चर्चा रंगलेली असते. काही दिवसांपुर्वी तिनं 'लोरियल पॅरिस'च्या एका कार्यक्रमात सहभाग दर्शवला होता. त्यावेळी तिनं एका संवेदनशील अनुभव शेअर केला होता.ज्यात तिनं स्ट्रीट हरॅसमेंटबद्दल सांगितले होते. शाळेतून घरी जाताना कशाप्रकारे तिला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. तिच्या या वक्तव्याचीही बरीच चर्चा रंगलेली होती. यावरून मोकळेपणानं आणि स्ट्रीट हॅरसमेंट विरूद्ध बोलल्यानं तिचं कौतुकही करण्यात आले होते. हा प्रसंग सांगताना त्या असंही म्हणाल्या होत्या की, ''आपल्या समाजातल्या मुली या तेव्हाच सुरक्षित राहतील जेव्हा आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करू. आम्हालाही दोन मुलं आहेत आणि मलाही त्यांना योग्य संस्कार देत वाढवायचं आहे.''