'सेक्समध्ये स्त्रियांना...' किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत, स्त्रियांच्या ऑरगॅजमवर बेधडक बोलले

Kiran Mane on Orgasm : अभिनेता किरण माने (Kiran Mane) कायमच त्यांच्या बिनधास्त पोस्टमुळे चर्चेत असतात. नुकताच प्रदर्शित झालेला 'Thank You For Coming' या सिनेमावर एक पोस्ट शेअर केली आहे. (Post On Women Orgasm)सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. पुरुषांनी महिलांच्या आरोग्य आणि त्यांची खासगी आयुष्य, विचार याबद्दल माहित असणे गरजेचे असते. किरण मानेंची ही पोस्ट चर्चेत आली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 18, 2023, 12:14 PM IST
'सेक्समध्ये स्त्रियांना...' किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत, स्त्रियांच्या ऑरगॅजमवर बेधडक बोलले  title=

Kiran Mane Post : अभिनेता किरण माने यांनी 'बिग बॉस मराठी' असो किंवा 'मुलगी झाली हो' या दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांच मन जिंकल आहे, कायमच आपल्या बेधडक स्वभावामुळे किरण माने चर्चेतही राहिले आहेत. सध्या अशीच एक किरण मानेंची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या 'Thank You For Coming' या सिनेमाचं त्यांनी कौतुक केलं आहे यासाठी त्यांनी भली मोठी पोस्टही लिहिली आहे. स्त्रियांच्या ऑरगॅझमबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 

काय म्हणाले किरण माने

...मागच्या आठवड्यात एका सिनेमाचं कौतुक करताना एका जाणकार समीक्षकानं लिहिलं होतं की, 'क्लायमॅक्स फसलाय, पण सिनेमा छान आहे !'...वाचून म्हणाले, च्यायला हे कसं शक्य आहे..? 'क्लायमॅक्स' फसणारी कुठलीही गोष्ट चांगली कशी असू शकते??? उत्तम क्लायमॅक्ससाठी तर आयुष्यात सगळा झगडा सुरू असतो आपला...असो. ...तर अशा एका अति महत्त्वाच्या 'क्लायमॅक्स' बद्दल बिनधास्त बोलनारा भन्नाट पिक्चर परवा बघितला... 'थॅंक यू फॉर कमिंग' ! सेक्समध्ये स्त्रियांना हव्या असणार्‍या 'ऑरगॅजम'बद्दल मनोरंजनातनं काहीतरी सांगू पहाणारा असा भारतीय 'मेन स्ट्रीम' सिनेमा आजपर्यंत मी तरी पाहिला नव्हता.

'कामसूत्र' ग्रंथाचा दिला दाखला 

खरंतर याच आपल्या भारत देशानं हजारो वर्षांपूर्वी वात्स्यायन नांवाचा खराखुरा फेमिनिस्ट विचारवंत दिला. ज्यानं 'कामसूत्र' ग्रंथात लिहीलंय की 'सेक्समध्ये स्त्रियांच्या लैंगिक सुखालाही समान महत्त्व आहे. उत्तम सेक्स तोच असतो ज्यात स्त्री आणि पुरुष दोघेही एकत्र तृप्तीच्या चरमसीमेपर्यंत अर्थात क्लायमॅक्सपर्यन्त पोहोचतात.' 

किरण मानेंची पोस्ट

सिनेमाचं केलं कौतुक 

असा सिनेमा लिहिल्याबद्दल राधिका आनंद - प्रशस्ती सिंग या लेखिकांच्या जोडीला सलाम केला पायजे. पुरूषांसाठी स्त्रिचा 'जी पाॅईंट' शोधणं जितकं कठीण, तितकंच स्त्रिसाठी त्या गोष्टीचं महत्त्व एक्सप्लेन करणं अवघड... ते काम या दोघींनी अतिशय सहजपणे केलंय.  सेक्स... विशेषत: स्त्रियांनी सेक्सवर मोकळेपणानं बोलण्यामुळं ज्यांच्या भावना दुखावतात, त्या भावांनी हा सिनेमा जिथे लागलाय, त्या थिएटरच्या जवळपासबी फिरकू नये. 'थॅंक यू फॉर कमिंग' लैच ग्रेट नसला तरी एकवेळ आवर्जुन बघणेबल नक्कीच हाय ! - किरण माने.

पुरुषांना माहितच नसते ही गोष्ट

महिलांचे ऑरगॅजम किती महत्त्वाचे हे पुरुषांना बऱ्याचदा माहितच नसते. फक्त सेक्सकडे केवळ दोन चार मिनिटांचा खेळ आहे, असा समज असणाऱ्या पुरुषांसाठी हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आहे, असं किरण माने सांगतात.