शाहरुख खानचा Jawan एक नाही तर 4 चित्रपटांची कॉपी? दिग्दर्शकावर आरोप

Jawan Movie Copy : जवान हा चित्रपट एका तमिळ चित्रपटातून कॉपी केला आहे. तर इतकंच नाही तर अॅटलीनं अनेक दाक्षिणात्य गाजलेल्या चित्रपटातून काही सीन्स कॉपी केल्याचे म्हटले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 8, 2023, 03:59 PM IST
शाहरुख खानचा Jawan एक नाही तर 4 चित्रपटांची कॉपी? दिग्दर्शकावर आरोप title=
(Photo Credit : Social Media)

Jawan Movie Copy : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा जवान हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. त्यात काल हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दाक्षिणात्य लोकप्रिय दिग्दर्शक अॅटलीनं केलं आहे. दरम्यान, हा चित्रपट पाहिल्यानंतर काही प्रेक्षकांनी म्हटलं आहे की अॅटलीनं हा चित्रपट कॉपी केला आहे. अॅटलीनं वेगवेगळ्या चित्रपटांमधून सीन्स चोरत हा चित्रपट बनवल्याचे म्हटले आहे.  

अॅटलीनं शंकर या चित्रपटासाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलं. अॅटलीनं हिंदी चित्रपटसृष्टीत आता पदार्पण केलं आहे. त्याच्या या चित्रपटात शाहरुख खान महत्त्वाच्या भूमिकेत असला तरी देखील त्याला नेटकरी ट्रोल करत आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असली तरी देखील सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 'जवान' या चित्रपटानं इतर चित्रपटांमधील काही काही सीन्स कॉपी केल्याचे म्हटले जात आहे. त्यात चित्रपटात दाखवण्यात आलेले वडील-मुलाच्या डबल रोलला देखील तमिळ चित्रपटातून कॉपी केल्याचे म्हटले आहे. ज्यात दाखवण्यात आलं आहे की शाहरुख खान जो एक जेलर असतो तो कशा प्रकारे समाजात असलेल्या वाईट लोकांना शोधून काढतो. एक वडील त्याच्या मुलाला कशी मदत करतो, याच्या अवतीभोवती संपूर्ण कथालेखन हे या फिरते.

रिपोर्ट्सनुसार, 1989 मध्ये सत्यराज यांचा प्रदर्शित झालेला थाय नाडू या तमिळ चित्रपटाचा जवान हा संपूर्ण कॉपी आहे. नेटकरी ट्रोल करण्याचं कारण हे आहे की सत्यराज यांच्या या चित्रपटात अशाच त्यांचा डबल रोल आहे. थाय नाडू या चित्रपटाची आणि जवानचं कथा ही सारखी आहे. जवानमध्ये दाखवण्यात आलेल्या फ्लॅश बॅक सीनला देखील सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

अनेक प्रेक्षकांनी असं म्हटलं आहे की अॅटलीनं बऱ्याच चित्रपटांमधून त्यांच्यातले 10-10 मिनिटं कॉपी केले आहेत. प्रत्येक चित्रपटातील 10 मिनिटांचा सीन घेत त्यानं हा चित्रपट बनवला आहे. किती हुशारीनं त्यानं हे सगळे सीन वापरले आहेत. याविषयी नेटकऱ्यांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा : Jawan Collection Day 1: SRK च्या 'जवान'ने पहिल्या दिवशी किती पैसा कमावला पाहिलं का? आकडे पाहून बसेल धक्का

दरम्यान, जवानच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर भारतात बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये त्यानं 70 कोटींचा आकडा पार केला आहे. तर वर्ल्ड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चित्रपटानं एकूण 120 कोटींचा गल्ला केला आहे.