Sara Ali Khan ने रस्त्यावर केलेली 'ती' गोष्टी, ज्यामुळे लोकांनी सैफच्या लेकीला दिले पैसे

रॉयल आयुष्य जगणाऱ्या सैफच्या लेकीला लोकांनी रस्त्यावर का दिले पैसे, जाणून तुम्हालाही बसेल धक्का   

Updated: Aug 7, 2022, 03:52 PM IST
Sara Ali Khan ने रस्त्यावर केलेली 'ती' गोष्टी, ज्यामुळे लोकांनी सैफच्या लेकीला दिले पैसे title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो. सारा बॉलिवूडमधील एक सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे. साराने अनेक मोठ्या स्टार्ससोबत सिनेमांत काम केलंय. लवकरच सारा मोठ्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. साराची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. पतौडी कुटुंबाची लाडकी सारा अली खान तिच्या कायम तिच्या स्वभावामुळे देखील पापाराझींमध्ये प्रसिद्ध आहे. पण साराने रस्त्यावर असे काही केलं ज्यामुळे खुद्द साराची आई अमृता सिंग लेकीला भिकारी म्हणाली. 

एक मुलाखती दरम्यान साराने तिच्या जीवनातील एक महत्त्वाचा किस्सा सांगितला. एकदा सारा तिच्या आई-वडिलांसोबत फिरायला गेली होती. याच दरम्यान सैफ आणि अमृता एका दुकानात गेले होते आणि मी माझ्या हाउस-हेल्परसोबत बाहेर बसली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सारा पुढे म्हणाली, 'आई-वडील दुकानात गेल्यानंतर मी  दुकानाबाहेर नाचू लागले. तेव्हा लोकांनी मला पैसे दिले. पैसे देणाऱ्या लोकांना असं वाटलं असेल की, मी डान्स करत नाही तर भीक मागत आहे. तेव्हा डान्स करून पैसे मिळत आहेत, म्हणून मी पुन्हा नाचायला सुरूवात केली.'

एवढंच नाही तर साराने ते सर्व पैसे गोळा करुन स्वतःकडे ठेवले. पुढे सारा म्हणाली, 'माझ्या हाउस-हेल्परने सर्व काही माझ्या आई-वडिलांना सांगितलं. त्यांना सर्व काही गोंडस वाटलं. पण आई मला म्हणाली क्यूट नाही भिकारी म्हणून तुला पैसे दिले असतील... ' सध्या साराच्या आयुष्यातील  किस्सा तुफान चर्चेत आहे.