'तुझी पँट कुठे आहे?', कियारा अडवाणी ट्रोलिंगचा शिकार

कियाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. 

Updated: Aug 7, 2022, 03:49 PM IST
'तुझी पँट कुठे आहे?', कियारा अडवाणी ट्रोलिंगचा शिकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कियारा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा कियारा ही तिच्या स्टाइल आणि फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. कियाराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, सध्या कियाराला तिच्या स्टाइलमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरनं अलिकडेच ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या सक्सेससाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी करणच्या मुंबईतील राहत्या घरी आयोजित करण्यात आली होती. या चित्रपटात कियारा मुख्य भूमिके होती तर स्वत: च्या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत कियार नाही असं कसं होणार. पार्टीत कियारानं ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कियाराचा हा व्हिडीओ विरल भयानीनं शेअर केला आहे. व्हिडीओत कियारानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर तिनं पेस्टल लाइट ग्रीन कलरचा ओव्हर साइज ब्लेझर परिधान केलं आहे. या ड्रेसमध्ये कियारा खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती. पण तिचा हा लुक मात्र नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. त्यांनी यावरून कियाराला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केले आहे. 

कियाराच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी म्हणाला, 'दीदी पँट घालायला विसरली का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला समजत नाही हे लोक कोटसोबत पँट का नाही खरेदी करत नाहीत.' तिसरा नेटकरी म्हणाला,'तुझी पँट कुठे आहे?' अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी कियाराला ट्रोल केलं आहे. 

​ Kiara Advani Got Trolled For Her Dress At Karan Johar house for Jugjugg Jeeyo movie celebration

दरम्यान कियारा आडवणीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा एकत्र दुसरा चित्रपट असणार आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैय्या २’मध्ये दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. ‘भूल भुलैय्या २’ हा २०२२ मधील सर्वात यशस्वी बॉलिवूड चित्रपट आहे.