अभिनेत्रींवरील लैंगिक अत्याचारांवरुन वादळ उठलं असतानाच समांथाचं मोठं विधान, म्हणाली 'तेलुगू इंडस्ट्रीत....'

Samantha Prabhu on Hema Committee Report: हेमा समितीचा (Hema Committee Report) अहवाल समोर आल्यापासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत (South Film Industry) खळबळ उडाली आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री इंडस्ट्रीतील दुय्यम वागणूक, अत्याचार यावर भाष्य करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 31, 2024, 02:09 PM IST
अभिनेत्रींवरील लैंगिक अत्याचारांवरुन वादळ उठलं असतानाच समांथाचं मोठं विधान, म्हणाली 'तेलुगू इंडस्ट्रीत....' title=

Samantha Prabhu on Hema Committee Report: हेमा समितीचा (Hema Committee Report) अहवाल समोर आल्यापासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत (South Film Industry) खळबळ उडाली आहे. अहवालामध्ये चित्रपटसृष्टीत मिळणारा दुजाभाव, अत्याचार, लैंगिच छळ यावर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यानंतर दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते अहवालावर आपलं मत मांडत आहेत. अभिनेत्री समांथा प्रभूनेही यावर आपलं मत मांडलं आहे. तेलुगू चित्रपसृष्टीतील लैंगिक अत्याचारावरही तेलंगणा सरकारने असाच अहवाल सादर करावा अशी मागणी तिने केली आहे. यामुळे महिलांना सुरक्षित वातावरणात काम करण्यास तसंच योजना आखण्यास मदत होईल असं तिने सांगितलं आहे. 

"तेलुगु चित्रपटसृष्टीतील आम्ही महिला हेमा समितीच्या अहवालाचं स्वागत करतो. आणि केरळमधील WCC च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं कौतुक करतो, ज्याने या क्षणापर्यंत मार्ग काढला आहे," असं समांथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीत म्हटलं आहे. 

पुढे ती म्हणाली आहे की, "आम्ही याद्वारे तेलंगणा सरकारला लैंगिक छळावर सादर केलेला उपसमितीचा अहवाल प्रकाशित करण्याची विनंती करतो, ज्यामुळे TFI (तेलुगु चित्रपट उद्योग) मध्ये महिलांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण तयार करण्यासंबंधी योजना आखण्यास आणि धोरणं तयार करण्यात सरकार आणि इंडस्ट्रीला मदत होईल".

न्यायमूर्ती हेमा समितीच्या 235 पानांच्या अहवालात, साक्षीदार आणि आरोपींची नावे बदलून प्रकाशित करण्यात आली आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीवर 10-15 पुरुष निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांचं नियंत्रण आहे असं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने 2017 मध्ये तीन सदस्यीय न्यायमूर्ती हेमा समितीची स्थापना केली होती आणि 2019 मध्ये अहवाल सादर केला होता. हा अहवाल जारी करण्यात आलेल्या कायदेशीर आव्हानांमुळे आतापर्यंत सार्वजनिक करण्यात आलेला नव्हता.

जर तेलंगणा सरकारने केलळप्रमाणे समिती स्थापन केली तर टॉलिवूडला फायदा होईल असं समांथाचं मत आहे. समांथा प्रभू शेवटची 'खुशी' चित्रपटात दिसली होती, ज्यात विजय देवरकोंडा सह-कलाकार होता. ती 'बंगाराम' नावाच्या प्रोजेक्टमध्येही काम करणार आहे. समांथाने यावर्षी तिच्या वाढदिवसाला या प्रोजेक्टची घोषणा केली. वरुण धवन, के के मेनन आणि सिकंदर खेरसह ती राज आणि डीकेच्या 'सिटाडेल: हनी बनी'मध्ये देखील काम करणार आहे. ही सीरिज यावर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.