नवी दिल्ली : बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगल्यामुळे जोधपूर कोर्टाने सलमान खानला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. जोधपूर ग्रामीणच्या अपर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शुक्रवारी हजर राहण्याचा आदेश सलमानला देण्यात आला आहे. जामीनासाठी २० हजार भरावे लागणार आहेत. हा खटला पूर्वी सीजेएम ग्रामीण कोर्टात चालू होता. तिथून सलमानला मुक्त करण्यात आले आहे.
जामीन भरण्याचे आदेश:
बॉलीवूड. कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार जोधपूर कोर्टाने पूर्वी एकदा सलमानला कोर्टात हजर राहण्याचा इशारा दिला आहे. परंतु, गेल्या वेळी सलमानच्या वकीलांनी पोलीस संरक्षणाची बाब पुढे करून हजर न राहण्याबद्दल माफी सादर केली होती. त्यामुळे सलमान जोधपूरला येणार नव्हते. शुक्रवारी या खटल्याची पुढील सुनावणी आहे आणि सलमानला जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर राहून जामीन भरण्याचा आदेश देण्यात आला आहे.
‘टाइगर जिंदा है’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त:
परंतु, सध्या सलमान ‘टाइगर जिंदा है’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली 'टाइगर जिंदा है' ची निर्मिती होत असून 'एक था टाइगर' या चित्रपटाचा तो सीक्वल आहे. यात सलमान खान आणि कतरीना कैफ मुख्य भूमिकेत आहेत.