नवी दिल्ली : ‘टायगर जिंदा है’ च्या निर्मात्यांची ज्या गोष्टीकडे नजर लागली होती. ती गोष्ट पूर्ण झाली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज झालेल्या सलमान खानच्या या सिनेमाने २०० कोटींचा जादुई आकडा पार केला आहे.
ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी या सिनेमाच्या कमाईचे ताजे आकडे सोशल मीडियात शेअर केले आहेत. गुरूवारी या सिनेमाने १५.४२ कोटी रूपयांचं कलेक्शन केलं आणि आत्तापर्यंत या सिनेमाने २०६.०४ कोटी रूपये झाली आहे. ग२२ डिसेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाने ३४.१० कोटी रूपयांची कमाई केली होती. तर पहिल्या तीन दिवसात या सिनेमाने १०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या यासिनेमाच्या माध्यमातून समलान खान आणि कतरिना कैफ़ ही जोडी तब्बल ५ वर्षांनी एकत्र आली. जाणकारांचं म्हणनं आहे की, हा सिनेमा ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होऊ शकतो. सलमानच्या या सिनेमासमोर दुसरा कोणताही सिनेमा टिकू शकला नाही.
या सिनेमाने पहिल्या दिवशी ३४.१० कोटी, दुस-या दिवशी ३५.३० कोटी, तिस-या दिवशी ४५.५३ कोटी, चौथ्या दिवशी ३६.५४ कोटी, पाचव्या दिवशी २१.६० कोटी, सहाव्य दिवशी १७.५५ कोटी आणि गुरूवारी म्हणजे सातव्या दिवशी १५.४२ कोटी रूपयांचं कलेक्शन केलं. ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ या सिनेमाचा सिक्वेल आहे.