Awkward Moment : कसं पकडलं! ...अन् Kim Kardashian पाहतच राहिला सलमान खान? VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा

Salman Khan Staring at Kim Kardashian :  अन् किम कर्दाशियनला पाहतच राहिला सलमान खान... पाहा व्हिडीओ

दिक्षा पाटील | Updated: Jul 22, 2024, 06:05 PM IST
Awkward Moment : कसं पकडलं! ...अन् Kim Kardashian पाहतच राहिला सलमान खान? VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Staring at Kim Kardashian : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाला 1 आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. मात्र, तरी देखील सोशल मीडियावर आजही त्याचीच चर्चा रंगली आहे. 12 जुलै रोजी ते दोघे लग्न बंधनात अडकले. त्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओत सलमान खान आणि किम कर्दाशियन आहेत. त्या दोघांना एकत्र पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. व्हिडीओमध्ये सलमान किमकडे पाहत असल्याचे दिसत आहे. 

अनंत राधिकाच्या लग्नात भारतीय चित्रपटसृष्टीशिवाय परदेशातूनही अनेकांनी हजेरी लावली होती. त्यात रिअॅलिटी शो टिव्ही स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किम कर्दाशियन तिची बहीण क्लोए कर्दाशियनसोबत अनंतच्या लग्नात पोहोचली होती. या कार्यक्रमासाठी त्या दोघी जवळपास तीन-चार दिवस मुंबईत होत्या. किमवर यावेळी भारतीय वेषात दिसली. तर किमला भारतीय वेषात पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. 

Salman Bhai caught in 4k .
byu/DressWonderful5396 inBollyBlindsNGossip

अनंतच्या लग्नातील हा व्हिडीओ आधीच्या ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेअर करण्यात लिहिण्यात आलं आहे की 'अनंत आणि राधिकाच्या लग्नात मेगा स्टार सलमान खान किम कर्दाशियन एकत्र. हा आयकॉनिक मुव्हमेंट आहे.'

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत मुकेश आणि नीता अंबानी सगळ्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत किम कर्दाशियनला स्टेजवर घेऊन जाताना दिसले. या दरम्यान, तिथे सलमान खान देखील उपस्थित होता. व्हिडीओत जसं दिसतंय त्याकडे पाहून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सलमान खान तिच्याकडे आश्चर्यानं पाहतोय. मग त्यानंतर तो मागे होतो. तर दुसरीकडे तिथे उपस्थित असलेले सगळे किमचे फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसले. किम आणि नीता अंबानी यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. 

हेही वाचा : 'एक कागद आम्हाला एकमेकांपासून दूर ठेवू शकत नाही!' आमिर खानबद्दल किरण रावचं मोठं विधान

अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग आणि लग्नात जगभरातील सेलिब्रिटी पाहायला मिळाले. सलमान खान, शाहरुख खान, बच्चन कुटुंब, ऐश्वर्या राय बच्चन, करण जोहर, महेश बाबू, राम चरण ते रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणपासून अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळाले.