Salman Khan च्या नावाचा बॉलिवूडमध्ये मोठा स्कॅम! भाईजाननं दिला इशारा

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं सोशल मीडियावर त्याच्या आणि सलमान खान फिल्म या प्रोडक्शन हाऊसच्या नावावार फसवणूक सुरु असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरून येणाऱ्या कोणत्याही मेसेज किंवा मेलवर विश्वास ठेवू नका असं म्हटलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 17, 2023, 04:55 PM IST
Salman Khan च्या नावाचा बॉलिवूडमध्ये मोठा स्कॅम! भाईजाननं दिला इशारा title=
(Photo Credit : Salman Khan Instagram)

Salman Khan : मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. इथे लोक कुठून कुठून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. त्यापैकी काही लोक हे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी येतात. त्यावेळी अनेकदा असं होतं की आपल्याला काही कास्टिंग एजन्सीमधून कॉल येतात किंवा मेसेज येतात. मग आपण तिथे जातो. त्यात जर हा कॉल किंवा मेल बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या कास्टिंग एजन्सीमधून आला असेल तर... मग कोणीही लगेच तिथे जाईल. पण तुम्हाला माहितीये सलमान खानच्या नावावर लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. हे सलमानच्या निदर्शनात येताच त्यानं सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. 

सलमान खानचं स्वत: च एक प्रोडक्शन हाऊस असून 'सलमान खान फिल्म्स' असं त्याचं नाव आहे. त्या प्रोडक्शन हाऊसनं त्यानं हीरो आणि किसी का भाई किसी की जान सारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याच प्रोडक्शन कंपनीचं नाव घेत लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचं सांगत सलमान खाननं एक मोठी गोष्ट सांगितली आहे. सलमाननं याविषयी सांगत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले, "मला ही गोष्ट स्पष्ट करायची आहे की सध्या ना सलमान खान किंवा नाही सलमान खान फिल्म कोणीही कास्टिंग करत नाही आहे. आमच्या आगामी चित्रपटांच्या कास्टिंगसाठी आम्ही कोणत्याही बाहेरच्या एजंसीला हायर केलेला नाही. जर तुम्हाला याच्या संदर्भात कोणताही मेसेज किंवा मेल आला तर त्यावर विश्वास ठेवू नका. जर कुठे मिस्टर खान किंवा SKF फिल्म यांच्या नावाचा चुकीचा वापर केला तर त्यांच्या विरोधात लीगल अॅक्शन घेण्यात येईल."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच घटना समोर आली होती. अभिनेत्री डोनल बिष्टला एक फेक मेल आला होता. याक करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव होतं. आता सलमान खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टनं अशी चर्चा सुरु झाली आहे की त्याच्या बाबातीतही असं घडलं असावं. कोणीतरी त्याच्या नावाचा चुकीचा वापर केला असावा आणि ही माहित समोर येताच त्यानं ही पोस्ट शेअर केली आहे. 

हेही वाचा : Anupam Kher यांनी चक्क डोक्यावर काढला टॅट्यू! व्हिडीओ व्हायरल

सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटानंतर सलमान आता लवकरच 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट टायगर फ्रॅन्चायझीचा तिसरा भाग आहे. हा चित्रपट यशराज बॅनरच्या अंतर्गत बनवण्यात येत आहे. तर त्याच्यासोबत या चित्रपटात कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.