मुंबई : अभिनेता सलमान खानने नुकताचं अभिनेते कबीर बेदी यांच्यासोबत इनस्टाग्रामच्या माध्यमातून संवाद साधला. या लाईव्ह सेशनमध्ये कबीर बेदी यांनी ऑटोबायोग्राफी ' Stories I Must Tell: The Emotional Life of an Actor' संदर्भात अभिनेता सलमान खानसोबत संवाद साधला. यावेळी सलमानने त्याच्या आयुष्यात केलेल्या चुकांबद्दल आपलं मत मांडलं. सध्या कबीर आणि सलमानच्या या लाईव्ह चर्चा तुफान व्हायरल होत आहे.
लाईव्ह चॅट दरम्यान कबीर बेदी त्यांच्या चुकांबद्दल बोलत होते. त्यांच्यानंतर सलमान म्हणाला, 'आपल्याकडून झालेल्या चुका मान्य करणं फार कठीण असतं. कोणीही आपल्या चुका सहज मान्य करत नाहीत. मी देखील अशा व्यक्तींपैकी एक आहे. मी चुका केल्या आहेत आणि मी माझ्या चुका सुधरवण्याचा प्रयत्न देखील केला.'
पुढे सलमान म्हणाला, 'स्वतःच्या चुका मान्य करण्यासाठी हिंमत लागते. आशी देखील वेळ आली जेव्हा मी माझ्या चुकांसाठी माफी मागितली. चुका होतात पण त्याचं चुका पुन्हा करणं योग्य नाही. ' सलमान खान प्रामाणिकपणाबद्दल म्हणाला, 'जेव्हा तुम्ही पुस्कत लिहीता तेव्हा स्वतःचं परिक्षण करणं फार गरजेचं असतं.'