करीना नाही तर या परदेशी मुलीसाठी सैफने अमृताशी केला काडीमोड

अभिनेता सैफ अली खान त्याच्या चित्रपटांमुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. 

Updated: Jun 26, 2021, 11:47 AM IST
करीना नाही तर या परदेशी मुलीसाठी सैफने अमृताशी केला काडीमोड title=

मुंबई : अभिनेता सैफ अली खान त्याच्या चित्रपटांमुळे कमी तर खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. 10 वर्ष लहान असलेल्या सैफने जेव्हा अभिनेत्री करीना कपूर खानसोबत लग्न केलं. तेव्हा देखील त्यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली होती. करीनासोबत लग्न करण्यापूर्वी त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंहसोबत झालं. पण त्यांचं नातं फार जास्त काळ टिकलं नाही. सर्वांना असं वाटतं की करीनामुळे सैफचं पहिलं कुटुंब तुटलं. फार कमी लोकांना माहिती आहे की करीनामुळे नाही  तर मॉडेल रोझा  कॅटलानोमुळे अमृता आणि सैफमध्ये दुरावा निर्माण झाला होता. 

अमृता आणि सैफच्या लग्नाला 10 वर्षा झाली आणि त्या दोघांमध्ये रोझाची एन्ट्री झाली. ही गोष्ट जेव्हा अमृता  कळाली, तेव्हा दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. नात्यात सतत येत असलेल्या अडचणींमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर सैफ आणि रोझा यांच्या भेटी वाढू लागल्या. 

पण रोझा आणि सैफचं नातं देखील फार काळ टिकू शकलं नाही. सैफ आणि रोझाचं ब्रेकअप झालं. जेव्हा सैफ आणि अमृताचं घटस्फोट झालं तेव्हा रोझा देखील त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. आता सध्या रोझा कोठे आहे आणि काय करते याबद्दल काही माहिती नाही. त्यानंतर सैफच्या मनात करीनाने घर केलं आणि दोघांनी लग्न केलं.