भर रेड कार्पेटवर सलमानने अभिनेत्यालं केलं किस

सर्वांसमोर अभिनेत्याला किस करण्याची वेळ का आली सलमानवर  

Updated: Dec 3, 2021, 08:59 AM IST
भर रेड कार्पेटवर सलमानने अभिनेत्यालं केलं किस  title=

मुंबई :  अभिनेता सलमान खान त्याच्या मित्रांना सपोर्ट करण्यात कधीही मागे हटत नाही. मित्रांच्या मुलांचा विचार केला तर स्टारकिड्ससाठी सलमान खान एक पाऊल पुढे असतो. सलमान खानने इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींच्या मुलांना आपल्या सिनेमांमधून लॉन्च केले आहे. आता सलमान खान अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहानवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. अहान लवकरचं नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

अहान शेट्टीचा डेब्यू सिनेमा 'तडप'चे स्क्रिनिंग गुरुवारी पार पडले. सुनील शेट्टी मुलाला आधार देण्यासाठी आला. महत्त्वाचं म्हणजे सलमान खानही त्यांच्यासोबत होता. स्क्रिनिंगचा एक भाग असल्याने, सलमान खानने सुनील शेट्टी आणि निर्माता साजिद नाडियादवाला यांच्यासोबत एका फोटोसाठी पोज दिली. 

तसेच, त्याने अहान शेट्टीच्या पोस्टरला किस केले. सलमान खानचं प्रेम पाहून पापाराझी खूप उत्साहित झाले. तसेच सुनील शेट्टीही खूप आनंदी होता. त्याने आनंदात मित्र सलमान खानला मिठी मारली. खुद्द सुनिल शेट्टीने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुनिलने व्हिडीओ पोस्ट करत कमेन्टमध्ये 'ट्रू फ्रेन्डशिप' असं लिहलं आहे.  चाहत्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. एका चाहत्याने कमेंट केली की, 'सलमान खानचे प्रेम खरे आहे. सगळ्यांचा भाईजान...'