या कारणामुळे पाकिस्तानात रिलीज होणार नाही 'टायगर जिंदा है' सिनेमा

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है हा सिनेमा येत्या २२ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. मात्र पाकिस्तानातील फिल्मी चाहत्यांना या सिनेमासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने आतापर्यंत या सिनेमाला सर्टिफिकेट दिलेले नाहीये.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 14, 2017, 10:55 AM IST
या कारणामुळे पाकिस्तानात रिलीज होणार नाही 'टायगर जिंदा है' सिनेमा title=

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है हा सिनेमा येत्या २२ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. मात्र पाकिस्तानातील फिल्मी चाहत्यांना या सिनेमासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने आतापर्यंत या सिनेमाला सर्टिफिकेट दिलेले नाहीये.

सूत्रांच्या माहितीनुसार सलमानचा हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार नाहीये. पाकिस्तानच्या प्रसारण मंत्रालयाने या सिनेमातील काही सीन्सना विरोध केलाय. याच कारणामुळे हा सिनेमा रिलीज होण्यात अडचणी येतायत. 

एक था टायगर या सिनेमाचा सिक्वेल

टायगर जिंदा है हा सिनेमा २०१२मधील एक था टायगर या सिनेमाचा सिक्वेल आहे. या सिक्वेलचे नवे पोस्टर आणि प्रोमोपण रिलीज झालाय. यशराज फिल्म्सने ट्विटर अकाऊंटवर या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले होते. यात सलमान खानच्या हातात कुऱ्हाड घेऊन एका कोल्ह्यासमोर उभा आहे. 

पोस्टरशिवाय सिनेमाचा एक प्रोमोही ट्विट करण्यात आलाय ज्यात सलमान कोल्ह्याशी सामना करताना दिसतोय. सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जाफर आणि खुद्द सलमान खानने सिनेमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केलाय.

या व्हिडीओत कोल्ह्यांची एक झुंड सलमानचा पाठलाग करतोय आणि सलमान बर्फात स्केटिंग करत त्यांचा सामना करताना दिसतोय.