'बिग बॉस' निर्मात्यांकडून फॅन्ससाठी आनंदाची बातमी

शो ची वाढती पॉप्युलिरीटी पाहता  'बिग बॉस ११'चे दोन हफ्ते वाढविण्यात येणार आहेत. 

Updated: Dec 14, 2017, 10:23 AM IST
 'बिग बॉस' निर्मात्यांकडून फॅन्ससाठी आनंदाची बातमी  title=

मुंबई : कलर्सच्या एंटरटेनमेंट आणि कॉन्ट्रवर्सीने भरलेल्या 'बिग बॉस ११' ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. या सिझनचे सर्व स्पर्धकही चांगलेच चर्चेत आहे.

शिल्पा शिंदे, अर्शी खान, हिना खान, प्रियांक शर्मा आणि विकास गुप्ता अशा घरातील मजेशीर आणि एंटरटेनिंग स्पर्धक प्रेक्षकांना आवडत आहेत.

शो ची वाढती पॉप्युलिरीटी पाहता  'बिग बॉस ११'चे दोन हफ्ते वाढविण्यात येणार आहेत. 

फॅन्ससाठी आनंद 

एक्सटेंशन वाढविले तर शो च्या फॅन्ससाठी यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नसेल. गेले तीन महिने सलग शो पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

स्पर्धक यशस्वी  

सेलिब्रेटी आणि कॉमनर्सच्या थीमवर या सिझनमध्ये हिना खान,शिल्पा शिंदे, हितेन तेजवाननी, अर्शी खान, विकास गुप्ता, प्रियंक शर्मा, लव त्यागी, पुनीष शर्मा आमि आकाश डडलानीसारखे स्पर्धक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहेत. 

सलमानशी बोलून निर्णय 

आजतक.कॉमने दिलेल्या बातमीनुसार शो चा वाढता टीआरपी आणि सलमानची पॉप्यूलॅरीटी याचा जास्त फायदा निर्माते करून घेणार आहेत.

 यासंदर्भात सलमानशी बोलूनच पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामूळे ग्रॅंड फायनल पुढच्या वर्षी जानेवारीत होईल.